मुंबई : शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठीच्या १५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. ही शिवसेनेची तिसरी यादी आहे. या यादीद्वारे शिवसेनेनं भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेनं मुंबादेवीमधून उमेदवारी दिली.
शिवसेनेची तिसरी यादी जाहीर : शिवसेनेनं सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजना जाधव यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच त्यांना उमेदवारी दिली आहे.
शायना एनसी, संजना जाधवांना उमेदवारी : भाजपा नेत्या शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर शायना एनसी यांना शिवेसनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
शिवसेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी
क्र. उमेदवाराचे नाव मतदारसंघ
1 - शशिकांत खेडेकर : सिंदखेडराजा
2 - घनसावंगी हिकम : उढाण
3 - संजना जाधव : कन्नड
4 - राजेश मोरे : कल्याण ग्रामीण
5 - भांडूप (पश्चिम) : अशोक मोरे
6 - शायना एनसी : मुंबादेवी
7 - अमोल खताळ : संगमनेर
8 - भाऊसाहेब कांबळे : श्रीरामपूर
9 - विठ्ठलराव लंघे-पाटील : नेवासा
10 - अजित पिंगळे : धाराशिव
11 - दिग्विजय बागल : करमाळा
12 - विठ्ठ्ल राऊत : बार्शी
13 - राजेश बेंडल :गुहागर
हेही वाचा -