ETV Bharat / politics

‘त्या’व्हायरल व्हिडीओवर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया; तर वादग्रस्त व्हिडिओमुळे भाजपातील इच्छुकांच्या स्वप्नांना धुमारे

Hemant Godse Viral Video: खासदार हेमंत गोडसे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गोडसे महिलेबरोबर कथित पॅसिव्ह स्मोकिंग करताना दिसून येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यामुळे गोडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Hemant Godse
खासदार हेमंत गोडसे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 2:08 PM IST

खासदार हेमंत गोडसे यांच्या महिलेसोबत पॅसिव्ह स्मोकिंग करताना व्हिडीओ

नाशिक Hemant Godse Viral Video : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा खासदार राहिलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा महिलेबरोबरचा कथितरीत्या पॅसिव्ह स्मोकिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं विरोधक जोरदार टीका करत आहेत. हा व्हिडिओ मॅार्फ करून राजकारण केलं जात असल्याचा आरोप खासदार हेमंत गोडसे यांनी केलाय. व्हायरल व्हिडिओ करणाऱ्याच्या विरोधात नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही जागावाटपात ही सीट भाजपाकडे येईल, या आशेमुळं इच्छुकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.

बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा खासदार गोडसे हे दिल्ली येथे होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली. अधिवेशनाच्या कालावधीत आपण व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीनं माझ्या बदनामीसाठी मॉर्फ व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. या कथित मॉर्फ केलेल्या व्हिडिओची सविस्तर चौकशी करून बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी, हेमंत गोडसे यांनी केलीय. याबाबत सायबर क्राईम विभागाच्या पोलीस निरीक्षकांना देखील या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे.

यांच्या विरोधात तक्रार दाखल : खासदार हेमंत गोडसे यांच्या संदर्भात फेसबुकवर आणि योद्धा ग्रुपवरील व्हायरल व्हिडिओ संदर्भात एका मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. अमोल चंद्रशेखर जोशी हे खासदार गोडसे यांचे कार्यालयीन प्रमुख आहेत. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे, अतुल राजे भवर यांच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ दिसला. त्याचप्रमाणं योद्धा ग्रुपवर देखील हाच व्हिडिओ होता. त्यावर बदनामीकारक मजकूर होता. या संदर्भात अमोल जोशी यांनी खासदार गोडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांवेळी गोडसे यांनी हा व्हिडिओ माझा नसून मॉर्फ केला आहे असं सांगितलं.

काय आहे व्हिडिओ : वादग्रस्त व्हिडिओमध्ये एक अनोळखी महिला खासदार हेमंत गोडसे यांच्या शेजारी बसली आहे. ती पॅसिव्ह स्मोकिंग (हुक्का) करत आहे आणि धूर हेमंत गोडसे यांच्या तोंडावर सोडत आहे.

"माझ्यासंदर्भात मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करून हीन दर्जाचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळं असा प्रकार करणाऱ्या विरोधात मी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केलीय." - हेमंत गोडसे, खासदार

भाजपा इच्छुकांच्या स्वप्नांना धुमारे : 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर गोडसे निवडून आले. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी राजकारणामध्ये हेवीवेट मानले जाणाऱ्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका पुतण्यांचा अनुक्रमे पराभव केला होता. आता भाजपाने नाशिक लोकसभा मतदारसंघातून चाचपणी सुरू केलीय. निवडणुकीच्या तोंडावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ही जागा भाजपाला जाईल अशा इच्छुकांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळं अनेकांनी मेळावे घेत शक्तिप्रदर्शनही सुरू केलं आहे.

हेही वाचा -

  1. Hemant Godse Criticizes On Sanjay Raut : संजय राऊत शिवसेनेतील सडका कांदा : खासदार हेमंत गोडसे
  2. Sansad Adarsh Gram Yojana Nashik : खासदार हेमंत गोडसेंनी दत्तक घेतलेल्या गावात आजही महिलांची पाण्यासाठी पायपीट
  3. Dr. Bharati Pawar Corona Infected : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.