पुणे Jyoti Mete Joins NCP : दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार आणि ज्योती मेटे यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. ज्योती मेटे या बीडमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत.
ज्योती मेटे शरद पवार गटात : पुढील महिन्यात देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. भाजपानं बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलीय. अशातच महायुतीला बीडमध्ये फटका बसणार आहे. शिवसंग्राम संघटना महायुतीमधून बाहेर पडणार असून, शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आत्ता बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकतं माप : ज्योती मेटे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनवणे यांनी देखील काही दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकतं माप मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीडमधून भाजपाकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय.
मराठा विरुद्ध ओबीसी? : शरद पवार हे पंकजा मुंडेंच्या विरोधात महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसंच बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असे दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात आहेत. मुंडे आणि मेटे या दोन्ही परिवारांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली तर मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना येथे रंगण्याची शक्यता आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी अशी लढत बीडमध्ये होवू शकते.
कोण आहेत ज्योती मेटे? : मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येतं असल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा -
- Lok Sabha Elections : भाजपाकडून आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन; कारवाई न झाल्यास हाताचा पंजा देणार भेट, काँग्रेसचा आरोप
- MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण
- MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण