ETV Bharat / politics

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं लोकसभेच्या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात बीड लोकसभेत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना संधी देण्यात आलीय.

Bajrang Sonawane
शरद पवार आणि बजरंग सोनवणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 8:30 PM IST

बीड Lok Sabha Election 2024 : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. यातच महायुतीनं पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अनेक दिवस महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाट पहावी लागली. आज बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं केली.

Lok Sabha Election 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर

सोनवणे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात : बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी अनेक दिवस होते. या अगोदर बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवली होती. त्यामध्ये त्यांना पाच लाख मते पडली होती. तर प्रीतम मुंडे यांना सहा लाख मते पडली होती. मात्र, प्रीतम मुंडे यांना राज्यासह देशात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. राज्यामध्ये गेल्या काही दिवसात राजकारण ढवळून निघाल्यानंतर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यामुळं भाजपाची अनेक मंडळी नाराज आहेत.

इतर उमेदवारीला पूर्णविराम : राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सभा घेतल्या. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील सर्व मराठा समाजाला एकत्र करत आहेत. मात्र, त्यांनी लोकसभेला उमेदवार देणार असं त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला नाही. तर दुसरीकडं बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अनेक उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये ज्योती मेटे, जयसिंग गायकवाड, बजरंग सोनवणे, ईश्वर मुंडे, नरेंद्र काळे, सुशीला मोराळे यांचा समावेश आहे. यांना शरद पवार यांनी सांगितलं होतं की, तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ मात्र, आज बजरंग सोनवणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. यामुळं बाकी सर्व उमेदवारांच्या उमेदवारीला पूर्णविराम मिळाला आहे.

मतदारांचा कौल कोणाला : आता बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्यातून काही अपक्ष उमेदवार उभे राहतील का? हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. कारण ज्योती मेटे या दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. विनायक मेटे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभं केलं होतं. मराठा आरक्षणाच्या बैठकीस जात असतानाच त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यामुळं मराठा समाज ज्योती मेटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभा करतील का?, की बजरंग सोनवणे यांना मदत करतील. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळं आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळणार का? तसंच मतदारांचा कौल कोणाला असणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा -

  1. "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news
  2. नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana
  3. उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.