ETV Bharat / politics

विधान परिषद निवडणुकीत मविआला आणि महायुतीला मिळणार किती जागा? - Vidhan Parishad Election - VIDHAN PARISHAD ELECTION

Vidhan Parishad Election: विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या अकरा जागांची निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सध्याचे विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू आहे. सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीला 8 तर महाविकास आघाडीला तीन जागांवर सहज विजय मिळवता येऊ शकणार असल्याची प्रतिक्रिया, राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.

Maha Vikas Aghadi Formula For Seat Sharing
मविआला आणि महायुतीला किती जागा मिळणार (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 7:55 PM IST

मुंबई Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी विधिमंडळाचे 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 14 आमदारांच्या जागा रिक्त असल्यानं या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 26 आमदारांची पहिल्या पसंतीची मतं मिळवणं आवश्यक आहे. सध्या आमदारांच्या सर्वाधिक रिक्त जागा काँग्रेस पक्षाच्या असल्यानं त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे.

राजकीय पक्षांना ताकद आजमावण्याची संधी : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आपली ताकद आजमावून पाहण्याची आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची संधी या मतदानामुळं मिळणार आहे.

'या' आमदारांचा संपतोय कार्यकाल : मनिषा कायंदे, विजय (भाई) गिरकर, बाबाजानी दुराणी, नीलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्जा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील (शेकाप) या विधानसभेमधून परिषदेवर गेलेल्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या रिक्त जागांसाठी 25 जून पासून निवडणुकीची अधिसूचना जारी केली गेली आणि आता 2 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दखल केले जाणार आहेत. जर जेवढ्या जागा तितकेच अर्ज दाखल झाले तर निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाची आवश्यकता राहणार नाही. पण तसं होण्याची शक्यता कमीच असून 12 जुलै रोजी मतदान मुंबई विधानभवनात घेतलं जाणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

विद्यमान आमदारांना मतदानाची शेवटची संधी : ऑक्टोबरमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यानं विद्यमान सभागृहातील उर्वरीत सदस्यांना मतदान करून कोणाला तरी निवडून देण्याची ही अखेरचीच संधी असेल. जून 2022 मध्ये राज्यसभा आणि पाठोपाठ विधान परिषदेसाठी आमदारांनी जे मतदान केलं त्यातून राज्यात इतिहास घडला होता. ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकारची स्थापना भाजपाच्या प्रेरणेने झाली होती. आता यावेळी काय घडणार ? विरोधी किंवा सत्तारूढ बाजूच्या मतांची फाटाफूट होते का? याबाबत उत्सुकता राहणार असल्याचं राजकीय अभ्यासक उदय तानपाठक यांनी सांगितलं.

14 जागा का झाल्या रिक्त : 288 सदस्यांच्या विधानसभेत सध्या 14 जागा या राजीनामे, निधन आणि न्यायप्रविष्ट असल्यानं रिक्त आहेत. लोकसभा निवडणुका लढण्यासाठी शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या पाच तर राष्ट्रवादीच्या एका सदस्यानं राजीनामे दिले. काँग्रेसच्या बाजूच्या अशा तब्बल आठ जागा रिक्त आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांना न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानं त्यांची आमदारकी 23 डिसेंबर 2023 रोजी रद्द झाली. अशोक चव्हाणांनी काँग्रेसची आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केला. शिंदे सेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचे राजू पारवे यांनी पक्ष त्याग केला. कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, बळवंत वानखडे आणि प्रतिभा धानोरकर अशा चार सदस्यांनी खासदार झाल्यानंतर आमदारकीचे राजीनामे दिले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकरांनी आमदारकी सोडली. हे दोघेही खासदार झाले. शिंदे गटाचे अनिल बाबर यांचं निधन झालं. राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनीही आमदारकी सोडली आणि ते खासदार झाले. तर भाजपाचे गोवर्धन शर्मा तसंच राजेंद्र पटणी या दोघांचं निधन झालं. अशा प्रकारे भाजपा 2, शिंदे सेना 3, राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 8 अशा 14 जागा रिक्त आहेत.

कोणत्या पक्षाला किता जागा जिंकता येणार : विधानसभेमधून परिषदेवर पाठवण्याच्या जागांसाठी प्राधान्यक्रमाच्या मतदानातून निवडणूक होते. 274 सदस्यांमधून 11 जागा निवडताना विजयी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 26 मते मिळवावी लागणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडं 11 सदस्य उरले असून शिवेसना उबाठाकडं 16 आमदार आहेत. त्या दोघांची मिळून एक परिषदेची जागा विजयी होऊ शकते. मविआकडं काही मते शिल्लक राहतील. त्यांना अपक्ष आणि लहान पक्षांची मदत मिळाली तर त्यांची आणखी एक जागा विजयी होऊ शकते. उर्वरीत 8 जागा या भाजपा (103 आमदार), शिवसेना (शिंदे) 37, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 40 आमदार यांना मिळवता येतील असंही तानपाठक म्हणाले.

हेही वाचा -

  1. आमदार अपात्र ठरले तर त्यांचं मतदान विधान परिषद निवडणुकीत ग्राह्य की बाद? काय सांगते घटना? - Vidhan Parishad Election 2024
  2. राजकीय पक्ष लागले कामाला; विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान, पाहा वेळापत्रक - Vidhan Parishad Election 2024
  3. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.