ETV Bharat / politics

मनसेचं महायुतीतील कमळामुळं नाही तर धनुष्यबाणामुळं फिस्कटलं, संजय शिरसाटांची माहिती - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांसाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यावर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागावरून मोठं वक्तव्य केलंय.

Sanjay Shirsat On Raj Thackeray
संजय शिरसाट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 10:39 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : मनसे महायुतीत सहभागी होईल अशी मंगळवार पर्यंत चर्चा होती. मात्र, मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) याबाबत भूमिका स्पष्ट केलीय. "आम्हाला कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र आपण यास नकार दिला आणि आपल्या पक्षाचेच इंजिन चिन्ह हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे", राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनीही राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागावरून मोठं वक्तव्य केलंय.

कमळ नाही धनुष्यबाणावर लढण्याचा आग्रह : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. तसंच जागा वाटपावरून सुद्धा चर्चा झाली होती. यावेळी आमच्याकडून म्हणजे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर राज ठाकरेंनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव राज ठाकरे यांनी फेटाळून लावला. मनसैनिकांनी इंजिन हे पक्षाचं चिन्ह कमावलं आहे. त्यावरच निवडणूक लढवण्यावर राज ठाकरे ठाम राहिले आहेत. म्हणून राज ठाकरे यांचा महायुतीतील सहभाग फिस्कटला. राज ठाकरेंचा महायुतीतील सहभाग हा कमळ चिन्हावरून नाहीतर धनुष्यबाणावरून फिस्कटला असल्याची माहिती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिलीय.

दोन जागांचा प्रस्ताव : पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, राज ठाकरेंशी जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती, तेव्हा या दोन जागांवर धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आला होता. मात्र, मी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, तर इंजिन या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेन असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांचा महायुतीत सहभाग होऊ शकला नाही. तसंच ज्या दोन जागांचा प्रस्ताव होता त्यातली एक जागा म्हणजे मुंबईतील आणि दुसरी मुंबईबाहेरील होती.

आता ते महायुतीत आल्यासारखे : राज ठाकरे यांना आता तुम्ही महायुतीत येण्यासाठी पुन्हा काही चर्चा किंवा बोलणी करणार का? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले की, आता चर्चा किंवा बोलणी करायचा प्रश्नच येत नाही. कारण राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांसाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा न ठेवता महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे पदाधिकारी यांची बैठक घेऊन लवकरच प्रचाराला देखील सुरुवात करतील.

हेही वाचा -

  1. पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याचा होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश, उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Lok Sabha Election
  2. मुनगंटीवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद; तरुणानं प्रचार रथावर केली शेण फेक - Lok Sabha Election 2024
  3. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड - Sibling Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.