ETV Bharat / politics

"रवींद्र वायकरांच्या निकालात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोठा हात''; संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Mumbai North West election - MUMBAI NORTH WEST ELECTION

Mumbai North West election : मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांचा झालेला विजय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते मुंबईत आज माध्यमांशी बोलत होते.

Mumbai North West election
Mumbai North West election (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 1:21 PM IST

मुंबई Mumbai North West election : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पदाचा गैरवापर करत रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केलं होतं, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी निवडणूक आयोगानं रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं, अशी मागणी त्यांनी केली.

एलॉन मस्क यांना शिकवणी लावावी लागेल : संजय राऊत म्हणाले की, ''या देशातील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा निकाल हा संपूर्ण देशातील निकाल प्रक्रियेतील एक आदर्श घोटाळा आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या टोळक्यांनी अनेक मतदार संघात कशा प्रकारे विजय मिळवला याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ आहे. शेवटच्या क्षणी जिथं जय-पराजय असं चित्र दिसत होतं. तिथं यंत्रणा ताब्यात घेऊन असे घोटाळे करण्यात आले. देशात असे 45 ठिकाणी निकाल लागले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय घोषित करण्यात आलेल्या अमोल कीर्तीकर यांना पराजित घोषित करण्यामागं तिथल्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. त्यात जी काही तांत्रिक खुलासे त्या करत आहेत तो त्यांचा प्रांत नाही. जर तसं असेल तर एलॉन मस्क यांनी वंदना सूर्यवंशी यांच्याकडे शिकवणी लावावी. ईव्हीएम मशीन कशा पद्धतीनं हॅक केलं जाऊ शकतं हे एलॉन मस्क स्वतः सांगत आहेत. मी काही म्हणत नाही," असंही संजय राऊत म्हणाले.

संपूर्ण निकाल रहस्यमय व संशयास्पद : संजय राऊत पुढे म्हणाले की, ''वंदना सूर्यवंशी यांचा पूर्व इतिहास तपासून बघितला पाहिजे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजं का दिलं जात नाही? त्यांना कोणाकोणाचे फोन आले? वंदना सूर्यवंशी यांचा फोनही ताब्यात घेतला पाहिजे. त्यांचे मेसेज चेक करा. त्यांचा सर्व स्टाफ आणि रवींद्र वायकर यांचे नातेवाईक त्या विभागात फिरत होते. वायकर यांचा जवळचा माणूस रिटायर पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वनराई पोलीस स्टेशनमध्ये का येरझाऱ्या घालत होता. त्याला काही डील करायचं होतं. ते झालं की नाही त्याचा तपास व्हायला पाहिजे. वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रकार झाला. तो यशस्वी झाला आहे का? त्याचप्रकारे हे सातारकर कोण आहेत? ते कोणाचे नातेवाईक आहेत. हा संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद असल्याकारणानं रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगानं लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे.''

नारायण राणे यांचा विजय पैशाच्या जोरावर : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या झालेल्या विजयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''कोकणात नारायण राणे यांचा 48 हजार मतांनी विजय झाला आहे. सकाळी पेपर टाकले जातात त्या पद्धतीनं नारायण राणे यांच्याकडून पैसे वाटण्यात आले." "पैशाचा वारेमाप वापर झाल्याकारणानं त्यांचा विजय झाला आहे. त्यांना केंद्रात मंत्री पद का दिलं गेलं नाही याचा त्यांनी विचार करावा," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा

  1. "संजय राऊतांना अटक करा"; प्रवीण दरेकरांनी का केली मागणी? - Pravin Darekar on Sanjay Raut
  2. "ईव्हीएम अन् मोबाईलचा संबंध..."; ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Ravindra Waikar VS Amol Kirtikar
  3. "पराभव झाल्यानं रडीचा डाव": रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, मुख्यमंत्री म्हणाले.... - MP Ravindra Waikar on EVM Hacking
  4. "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र झाला असता"; 400 पारच्या नाऱ्यावर भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य - T Raja Singh Statement

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.