नवी दिल्ली- शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपाचे हिंदुत्व नकली असल्याचा पुनरुच्चार केला.
खासदार संजय राऊत म्हणाले, "राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणात भाजपाच्या नकली हिंदुत्वाचा मुखटा उतरविला आहे. त्यांचे भाषण देशाला मार्गदर्शक आहे. राहुल गांधी काय चुकीचे बोलले आहेत? हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे द्वेष पसरविणे नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची भाजपाकडून टीका करण्यात येते. जे उद्धव ठाकरे सांगतात, तेच राहुल गांधींनी सांगितलं. मोदी आणि भाजपा म्हणजे सर्व हिंदू नाहीत. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. आम्ही भाजपाला सोडले आहे. हिंदुत्वाला सोडले नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. हिंदुत्वाची व्याप्ती भाजपाला कळणार नाही."
भाजपामध्ये पंतप्रधान मोदींबाबत कमालीची अस्वस्थता- राहुल गांधींच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांना काल लोकसभेचे सभापती ओम बिर्लांकडे संरक्षण मागावे लागले. लोकसभेत गृहमंत्री, पंतप्रधान आणि ९ मंत्री असताना राहुल गांधी यांनी त्यांना गुडघ्यावर आणले. ही फक्त सुरुवात आहे. भाजपामध्ये पंतप्रधान मोदींबाबत कमालीची अस्वस्थता आहे. एनडीएमध्ये चालले भजन ऐकून आनंद आणि गुदगुदल्या होतात," असा टोलाही राऊत यांनी लगावला. "संसदेत स्वत:ला हिंदू समजणाऱ्यांनी कान साफ करावे. भाजपाचे हे नकली हिंदूत्व आहे. हिंदुत्व म्हणजे संस्कार आहेत," असेही खासदार राऊत म्हणाले.
हर धर्म सिखाता है - डरो मत, डराओ मत।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2024
सत्य के साथ खड़ा होना चाहिए, उससे पीछे नहीं हटना चाहिए, और अहिंसा के रास्ते पर चलना चाहिए।
जब भाजपा ने देश में भय फैलाया, संविधान और लोकतंत्र की रक्षा के लिए INDIA ने इसी सोच को अपनाया। pic.twitter.com/SyPBkJHUMy
फडणवीस यांनी दलाल गोळा केले- विधानपरिषदेत अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार यांच्या खडाजंगी झाली. दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांसोबत असलेला एकही नेता भाजपाच्या विचाराचा नाही. फडणवीस यांनी दलाल गोळा केले आहेत. त्या टोळ्यांना हिंदुत्व आणि भाजपाचे विचार माहित आहेत का? शिवसेनेच्या अंगावर आले तर त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्यावे लागते."
काय म्हणाले होते राहुल गांधी?राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले " भिऊ नका आणि भीती दाखवू नका. अभयमुद्रा हे निर्भयतेचे चिन्ह आहे. हिंदू, इस्लाम, शीख आणि बौद्ध धर्मांमध्ये अभयमुद्रा आहे. जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात, ते फक्त हिंसा, द्वेष आणि असत्य पसरवितात. सत्यापासून ढळू नका, असे हिंदू धर्मात सांगितले. "
हेही वाचा-