ETV Bharat / politics

बाबा सिद्दिकींच्या काँग्रेस सोडून जाण्याच्या चर्चांवर काय म्हणाले संजय राऊत? - प्रकाश आंबेडकर

Sanjay Raut : संजय राऊत यांनी, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अधिकृत प्रवेश झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावरही जोरदार टीका केली. वाचा पूर्ण बातमी..

संजय राऊत
संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 1:19 PM IST

मुंबई Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करतील, तर काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी पक्ष सोडून जातील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी आज सडकून टीका केली. तसेच त्यांनी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत अधिकृत प्रवेश झाल्याचंही स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीत प्रवेश : महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर चर्चेला बसणार हे नक्की. त्यांचा महाविकास आघाडीत अधिकृत प्रवेश झाला आहे. राज्यातून भारतीय जनता पार्टीची हुकूमशाही हद्दपार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची साथीची गरज आहे. त्यामुळे त्यांची मदत आमच्या लढाईत फार महत्वाची असेल", असं संजय राऊत म्हणाले.

भ्रष्टाचार हा भाजपाचा खरा चेहरा : छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार, असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अंजली दमानिया यांचं वक्तव्य एकल आहे. छगन भुजबळ कोणत्या पार्टीत जातील? काय करतील? याबद्दल मी बोलू शकत नाही. मात्र ते भाजपाचा चेहरा बनू शकतात, असं जर कोणी म्हणत असेल तर यापूर्वी अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी भाजपाचा चेहरा बनल्या आहेत. भ्रष्टाचार हा भाजपाचा खरा चेहरा आहे. जो भ्रष्टाचारी भाजपा सोबत जाईल तो पवित्र बनेल तेव्हा ज्या नेत्यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं, आता त्यांची फाईल भेटत नाही. इव्हीएम आणि ईडी शिवाय भाजपा नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

बाबा सिद्दिकींचा मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न : काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि त्यांचे वडील अन् माजी आमदार बाबा सिद्दिकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे. झिशान सिद्दिकी आणि बाबा सिद्दिकी जर अजित पवार गटात प्रवेश करत असतील तर त्यांची विधानसभा जागा रिकामी होईल. ती जागा आम्ही जिंकू. बाबा सिद्दिकी हे मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत. मात्र जनता हे सर्व बघत असून निवडणुकीत ते त्यांना माफ करणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. ईडीकडून रोहित पवारांची नऊ तास चौकशी; चौकशीनंतर काय म्हणाले रोहित पवार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.