ETV Bharat / politics

देशातील महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर मोदींमुळंच; संजय राऊत यांची पंतप्रधानांवर टीका - Sanjay Raut On PM Narendra Modi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 7:30 PM IST

Sanjay Raut On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रावरून केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर या वक्तव्यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील आक्रमक झाले आहेत.

PM Narendra Modi And Amit Shah
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह
प्रतिक्रिया देताना संजय राऊत

मुंबई Sanjay Raut On PM Narendra Modi : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अनेक मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सध्या प्रचारात, महिलांच्या मंगळसूत्राचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेस आई-बहिणींचं मंगळसूत्र शिल्लक ठेवणार नाही. अशा प्रकारे राजस्थान मधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर देशभरासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यात मंगळसूत्रं गहाण पडत आहेत. जी व्यक्ती घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही, त्यांनी इतरांची उठाठेव करू नये, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय.

भाजपाच्या राज्यातच महिलांचे मंगळसूत्र गहाण : काँग्रेस नेते सॅम त्रिपोदा यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले की, यावर चर्चा होऊ शकते. त्यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही हे काँग्रेसनं स्पष्ट केलंय. तसंच मोदींनी जी नोटबंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्रं गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा जो रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं. काश्मीरमधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रं ही मोदी पुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्रं गेली. त्याला देखील मोदीच जबाबदार आहेत. किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? या देशात महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर आलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळंच असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

मोदी देश विकायला निघालेत : नरेंद्र मोदी हे निवडणुका हरणार आहेत, 4 जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल. सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे, तो देश विकण्याचं काम एकच प्रधानमंत्री करत आहेत ते म्हणजे मोदी. ज्यांच्याकडं बहुमत आहे तो त्या पदापर्यंत जाईल, दहा वर्षापर्यंत तुमच्याकडं बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात. आमच्याकडं एकाहून जास्त चेहरे प्रधान मंत्रीपदासाठी असल्याचं राऊत म्हणाले.

अयोध्या आंदोलनात कुठे होते : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, देशात काँग्रेसचं राज्य असताना शिवसेना आयोध्या आंदोलनात उतरली. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला हे तयार नव्हते. स्वतः अमित शाह यांच्या पक्षाचे नेते सुंदर सिंग भंडारी यांनी स्वतः भाजपाचा या घटनेची काहीही संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केलं असल्याचं जाहीर केलं होतं. अमित शाह तेव्हा राजकारणात किंवा तिथे मैदानात तरी होते का? जेव्हा आयोध्येत आंदोलन सुरू होतं तेव्हा हे डरपोक लोक कुठे होते. तेव्हा मैदानात आम्ही आणि शिवसेना होती हे जगजाहीर आहे. अमित शाह यांची शेवटची फडफड सुरू आहे. 4 जून नंतर यांनी केलेली सर्व कांडं बाहेर येतील. हे लोक निवडणुका हरणार आहेत. त्यामुळं रामाच्या नावानं आणि अयोध्याच्या मुद्द्यावरून निवडणुका जिंकण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे.

क्लीनचिटवर राऊत म्हणाले : शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या क्लीनचीटवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपा वॉशिंग मशीनसह क्लीनचीटची फॅक्टरी देखील आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, विजय मल्ल्या, नीरव मोदी या सर्व लोकांना देखील भाजपा क्लीनचीट देऊ शकते. यांना जर निवडणुका जिंकायच्या असतील तर यांना आधार त्यांचा घ्यावा लागणार आहे. दहशत माजवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी उद्या जर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना क्लीनचीट देण्याची बातमी आली तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.

साखर कारखान्यासाठी निवडणुकीआधी दिलेल्या निधीवरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ही निवडणुकीपूर्वी दिलेली लाच आहे. भ्रष्टाचार आहे, मतं विकत घेण्यासाठी त्या त्या भागात दिलेला हा सरकारी निधी आहे. कुठे आहे निवडणूक आयोग, त्यांनी आता याकडं लक्ष द्यावं. तसंच भाजपानं सांगली आणि संभाजीनगर दोन ठिकाणी उमेदवार ठेवले आहेत. आमच्या पहेलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडत आहे. त्यामुळं भाजपानं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. यावर आम्ही योग्य वेळी बोलू यामागे कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे, कोणाची ताकद आहे, खरं तर हे भाजपाचं कारस्थान आहे. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. चंद्रहार पाटील हे झपाट्यानं पुढे जात आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय. त्यामुळं घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपानं अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणलाय का, या संदर्भात लोकांच्या मनात शंका असल्याचं संजय राऊत म्हणाले.

त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही : शिंदे शिवसेना प्रचार गीताबाबत संजय राऊत म्हणाले की, 4 जून नंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, तुम्ही कोणतेही गीता तयार करा किंवा अजून काय तयार करा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट 4 जून नंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील, या दोघांचा एकही खासदार निवडून येत नाही असा दावा राऊत यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. अग्नीवीरसह कंत्राटी नोकर भरती रद्द करणार...राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं जाहीरनाम्यात काय दिली आहेत आश्वासनं? - NCP SCP releases manifesto
  2. शरद पवारांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्येसाठी पवारांनी माफी मागावी - अमित शाह - Amit Shah On Sharad Pawar
  3. "पराभवाच्या हताशेनं शिवीगाळ...", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.