ETV Bharat / politics

"फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही, ते औरंगजेब फॅन क्लबचे..."- संजय राऊतांची खोचक टीका - Surat loot remark

खासदार संजय राऊत यांनी इतिहासातील सुरतच्या लुटीवरून संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis
संजय राऊत देवेंद्र फडणवीस टीका (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 12:09 PM IST

मुंबई - शिवरायांनी सुरत लुटली नव्हती, असं दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच काँग्रेसनं खोटा इतिहास शिकवल्याचा आरोपदेखील केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिली. "शिवरायांनी सुरत एकदा नाही तर दोनदा लुटली असून, फडवणीस हे शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आहेत," असा राऊत यांनी हल्लाबोल केला.

शिवरायांनी सुरत दोनदा लुटली- खासदार संजय राऊत म्हणाले," देवेंद्र फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही. ते शिवरायांनी सुरत लुटली नसल्याचं म्हणतात. आता भाजपानं शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी चिंतन बैठक करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, असं ते म्हणतात. सुरतचे व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या सुरक्षेसाठी खंडणी द्यायचे. हे हिंदवी स्वराज्याच्या विरुद्ध होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की, व्यापाऱ्यांना लुटायला पाहिजे. कारण त्यांचा सर्व पैसा ईस्ट इंडियन कंपनीला जायचा." राष्ट्रहित लक्षात घेऊन त्यांनी सुरतवर हल्ला करून लुटलं. इतकंच नाही तर शिवरायांनी दोनदा सुरत लुटली, असंही राऊत म्हणाले.

तुम्ही इतिहासामध्ये का जाता? " देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास निराळा आहे. पंडित नेहरू यांनी तुरुंगामध्ये असताना 'डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर काही टिप्पणी केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी माफी मागितली," असे खासदार राऊत यांनी सांगितलं. "प्रश्न असा आहे की, तुम्ही इतिहासामध्ये का जाता? तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, त्यावर बोला. ज्याप्रकारे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. मंत्री केसरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. सुधांशू त्रिवेदींनी महाराजांचा अपमान केला. त्यावर बोला. पुण्यासारख्या ठिकाणी एका व्यक्तीची हत्या केली जाते. यावरून हे दिसतं की, राज्यातील कायदा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे."

देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नसून तोडला आहे. यामध्ये कोट्यावधींच्या भ्रष्टाचार करणारे आजही मोकळे आहेत. फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आहेत. बेळगाव, कारवारच्या सीमा प्रश्नी तुमची काय भूमिका आहे? ते स्पष्ट करा-खासदार, संजय राऊत

महाराजांचा पुतळा तुटला नाही, तर...संजय राऊत यांनी सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून भाजपावर कडाडून टीका केली. खासदार राऊत म्हणाले, " देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानामध्ये आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनाला चिरडण्याचं काम फडवणीस यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जय, असे बोलण्यापासून तुम्ही आम्हाला महाराष्ट्रामध्येच रोखत आहात."

हेही वाचा-

  1. " माजी खासदारांची गल्लोगल्ली दहशत, तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही", रामराजे निंबाळकरांचा भाजपाला इशारा - Ramraje Nimbalkar On BJP
  2. "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.