ETV Bharat / politics

सुप्रिया सुळेंचे आभार मानत रुपाली चाकणकरांची खोचक टीका, म्हणाल्या... - Rupali Chakankar - RUPALI CHAKANKAR

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंचे आभार मानत त्यांच्यावर खोचक टीका केलीय. तसंच त्यांना पंधरा वर्षे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना खासदारकी दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्या पुण्यात गुरुवारी रात्री माध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळेंचे आभार मानत रुपाली चाकणकरांची त्यांच्यावर खोचक टीका, म्हणाल्या...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 9:44 AM IST

रुपाली चाकणकर

पुणे Rupali Chakankar : रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. त्यांनी निवडून आणलं हे सुप्रिया सुळे पवार यांनी अखेर मान्य केलं. त्याच्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे पवार यांच्यावर केलीय. सुप्रिया सुळे यांनी "माझ्या वेळेस एवढं फिरावं लागत नव्हतं, माझा प्रचार करण्यासाठी अजित पवार फिरत होते, " असे वक्तव्य केलं होतं. त्याला आता रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

भाऊबीजची ओवाळणी म्हणून खासदारकी दिली : रुपाली चाकणकर म्हणाल्या, "अजित पवारांना त्यांना निवडून आणण्यासाठी किती कष्ट करावे लागत होते, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण अजित पवारांनी त्यांच्यापर्यंत ते कधी पोहोचू दिलं नाही. इतकी भावाची माया दिली. खरंतर अनेकांचा विरोध पत्करुन अजित पवारांनी पंधरा वर्षे सुप्रिया सुळे यांना निवडून आणलंय. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यांनी पंधरा वर्षे प्रचार केलेला आहे. या सगळ्यांमध्ये पंधरा वर्षे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खासदारकी दिलीय." तसंच या सगळ्या गोष्टींवर त्यांचं समाधान व्हायला हवं होतं, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. "बारामती लोकसभेत अजित पवारांनी केलेली विकास कामं मोठ्या प्रमाणात आहेत. चांगल्या प्रमाणात निधी दिलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्राधान्यक्रम दिला," असे चाकणकर यांनी म्हटले.

दोन दिवसांत उमेदवार जाहीर होणार : विजय शिवतारे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, " शेवटी हे राजकारण असतं. त्याच्यात मताचे प्रवाह वेगवेगळे असतात. शेवटी एक विचारानं एकत्र येतात. ही राजकारणाची सुरुवात आहे. साहजिकच विजय शिवतारेंनी जे बंड पुकारलं होतं, ते त्यांनी मागं घेतलेलं आहे. ते महायुती सहभागी झालेले आहेत. त्याचा महायुतीला फायदा होईल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस उर्वरित उमेदवार जाहीर करणार आहे. तर दोन उमेदवारांची नावं आता जाहीर केलेली आहेत. बाकी उमेदवारांची यादी लवकरच येईल, असं सुद्धा रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. शरद पवार गटाकडून छगन भुजबळ, रूपाली चाकणकरांचा निषेध; सावित्रीबाईंच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक
  2. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच, रुपाली चाकणकरांचा दावा
  3. Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरण; महिला आयोगाने घेतली दखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.