ETV Bharat / politics

इंग्रजानींही विकास केला म्हणून लोक त्यांच्यासोबत गेले का? - रोहित पवार - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Baramati Lok Sabha Constituency : आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. अजित पवारांच्या माध्यमातून बारामतीचा विकास झाल्यानं ते कामाची व्यक्ती असल्याचा प्रचार बारामती मतदारसंघात होत आहे. यावर रोहित पवारांनी ब्रिटिशांचा दाखला देत अजित पवारांना लक्ष्य केलंय.

Rohit Pawar and Ajit Pawar
रोहित पवार आणि अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 7:41 PM IST

प्रतिक्रिया देताना रोहित पवार

पुणे Baramati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections) जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघासाठी यंदा पवारांच्या घरातच नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. यामुळं या मतदारसंघाकडं सर्व देशाचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), तर राष्ट्रावादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षानं सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिलीय. पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय.

सुळे तीन लाख मतांनी निवडून येतील : ब्रिटिशांनी विकास केला म्हणून सामान्य जनता त्यांच्या मागे उभी राहणार का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. त्यामुळं रोहित पवारांनी अजित पवारांची तुलना थेट ब्रिटिशांशी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा शरद पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहे. पवार कुटुंबातील माणसे फोडून भाजपाच, हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत असून जनतेला हे पटणार नाही. त्यामुळं खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून तीन लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय.

विचार सोडला तर तो विकास होत नाही : अजित पवार हे विकास करणारे कामाची व्यक्ती आहे, असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, ⁠काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसं होणार? त्यामुळं विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार जास्त महत्त्वाचा आहे. ब्रिटिश किती ताकदवान आहेत, त्यांची देशांमध्ये किती सत्ता आहे असं म्हणून ब्रिटीशांनी विकास केला. असं म्हणत सामान्य जनता ब्रिटीशांबरोबर गेली असती का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळं विचार जास्त महत्त्वाचा आहे. ब्रिटीशांनी जी वृत्ती वापरून घर आणि माणसे फोडली तीच वृत्ती आज वापरली जात आहे. विकासाचा विचार केला तर बारामतीमध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी शरद पवार यांच्यामुळं झाली आहेत. तरी देखील विकासापेक्षा विचार अधिक जास्त म्हत्वाचा आहे. असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. "दहावा सर्व्हे केल्यानंतरच ते उमेदवार जाहीर करतील", बारामतीतील सर्व्हेवरुन रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं - Baramati Lok Sabha Constituency
  2. अजित पवार गट म्हणजे ४२० गँग! रोहित पवारांचा 'घड्याळ तेच वेळ नवी' वरुन टोला - Rohit Pawar
  3. शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटाळा? ८० कोटीची दलाली घेतल्याचा रोहित पवारांचा सरकारवर थेट आरोप - Rohit Pawar Allegations

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.