पुणे Rohit Pawar : आमदार रोहित पवार म्हणाले, " बारामती लोकसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे पवार यांचा प्रचार करणाऱ्या लोकांची यादी गुंडाकडं तयार करण्यात आलीय. अजित पवार गटाकडून गुंडांचा वापर करुन यांना धमकवलं जातंय. परंतु, जेवढं जास्त तुम्ही धमकवाल तेवढी जास्त लीड बारामतीत सुप्रिया सुळे यांना मिळेल, अशी विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. रोहित पवार यांनी रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
रोहित पवारांचे गंभीर आरोप : आमदार रोहित पवार म्हणाले, " बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या गुंडांकडून धमकावलं जातंय. पहिलं म्हणजे पुणे शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बदल्याची धमकी दिली जातेय. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लोकांकडून कर्ज मिळणार नाही, अशी धमकी देत अजित पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे पवार यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी शहरी भागातील गुंड लोकांकडं देण्यात आलेली आहे. तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर तुम्ही शरद पवारांचा प्रचार करू नका, अशा धमक्या हे गुंड लोक देत आहेत," असे गंभीर आरोप रोहित पवार यांनी केले आहेत.
भाजपाच्या नेत्यामंध्ये मतभिन्नता : भाजपामुळे नव्हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, असं आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी सभेत केला. त्यावर रोहित पवार म्हणाले, "केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळीसुद्धा सुप्रिया सुळे राजकारणात होत्या. पण त्यांनी कुठलंही मंत्रीपद घेतलं नाही. तसंच भाजपा नेते खोटं बोलत आहेत. भाजपाच्या दोन नेत्यांमध्येच मतभिन्नता आहे. अमित शाह म्हणतात, आम्ही पक्ष फोडला नाही. देवेंद्र फडवणीस म्हणतात, आम्ही दोन पक्ष फोडून सत्तेत आलो. त्यामुळं यांच्यामध्ये काय चाललंय ते त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा," असंही रोहित पवार म्हणाले.
ते सगळं खोटं बोलतात : धाराशिवमधील भाजपाचे नेते राणाजगजित सिंह यांचे चिरंजीव मल्हार पाटील भाजपामधील प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार यांनी आम्हाला भाजपात अगोदर पाठवल्याचं नुकतेच मल्हार पाटील म्हणाले होते. त्यावर आमदार पवार म्हणाले, "मल्हार पाटील हे अजित पवारांचे नातेवाईक आहेत. 2019 पासूनच त्यांच्या मनामध्ये भाजपा जाण्याची प्रक्रिया सुरु झाली असेल. पण आता ते विकासासाठी गेल्याचं, पवार साहेबांनी न्याय दिला नसल्याचं खोटे सांगून गेले. हे सिद्ध झालं."
हेही वाचा :