ETV Bharat / politics

सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे 'व्हू ईज धंगेकर' लोकसभेत काय करणार? 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत - Ravindra Dhangekar Interview

Ravindra Dhangekar Interview : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. सर्वच पक्षाचे नेते प्रचारात दंग झालेत. आरोप, प्रत्यारोप, टीका, दावे अशा विविध अंगांनी राजकीय वातावरण तापलंय. लोकसभा निवडणूक, 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेली विकासकामं अशा विविध विषयांवर महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत खास संवाद साधला.

Ravindra Dhangekar Special Interview
रवींद्र धंगेकर यांची विशेष मुलाखत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 7:30 PM IST

प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर

पुणे Ravindra Dhangekar Interview : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपानं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना, तर काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना तसंच वंचितनं वसंत मोरे (vasant More) आणि आत्ता एमआयएमनं अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून "काय म्हणताय पुणेकर" हा नारा दिला जात आहे. तर भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून "एक मत मोदींना" असा नारा दिला जात आहे. एकूणच पुणे लोकसभा मतदार संघातील प्रश्न, वंचित तसेच 'एमआयएम'कडून जाहीर झालेली उमेदवारी, 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेली विकासकामं अशा अनेक विषयांवर पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'नं खास बातचीत केली. त्यासाठी वरील व्हिडिओ पाहा....

धंगेकरांचा नवीन नारा : "ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. भारताचा वैभवशाली विकास हा काँग्रेसच्या काळात झाला.भाजपाची सत्ता आली आणि भारताची अर्थव्यवस्था ढासळली. काँग्रेस पक्षानं माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. म्हणून मी म्हणतोय "काय म्हणताय पुणेकर, निवडून येणार धंगेकर" आणि पुणेकर मला दिल्लीला पाठवतील," असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना व्यक्त केला.

कोण आहेत रवींद्र धंगेकर? : काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. कसबा पेठ भाजपाचा बालेकिल्ला असून, रवींद्र धंगेकर यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली होती. प्रदीर्घ काळापासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे तगडे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपाचे दिवंगत गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला होता.

पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांनी काँग्रेस उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला. 2014 मध्ये काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपाचे अनिल शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपाच्या अनिल शिरोळे यांनी विश्वजीत कदम यांना 3 लाख 15 हजार मतांनी पराभूत केलं होतं. 2019 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपाकडून गिरीश बापट उमेदवार होते. 2019 मध्ये भाजपाकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता भाजपा महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता होती. भाजपाचा उमेदवार ठरून अनेक दिवस होऊनही काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळं शेवटी काँग्रेसला निवडणूक अवघड झाली. गिरीश बापट यांनी 2019 च्या या निवडणुकीत 3 लाख मतांनी बाजी मारली होती.

हेही वाचा -

  1. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आणले कुठून? ॲड. यशोमती ठाकूरांचा नवनीत राणांना सवाल - Adv Yashomati Thakur
  2. ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI
  3. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लोढा की नार्वेकर? 'सागर'वर रात्री महत्त्वपूर्ण बैठक - South Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.