ETV Bharat / politics

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवार (4 मे) जाहीर सभा घेतली. तर या सभेचा राणेंचा कितपत फायदा होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Narayan Rane and Raj Thackeray
नारायण राणे आणि राज ठाकरे (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 4:22 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी (4 मे) प्रचार सभा घेतली. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. त्यामुळं ही लढत चुरशीची होणार आहे. तर शनिवारी राज ठाकरेंनी केलेलं भाषण, हे नारायण राणेंसाठी कितपत प्रभावी ठरेल? लोकांचं मत परिवर्तन होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मतदारांवर प्रभाव पडेल? : एखादा विषय पद्धतशीरपणे मांडणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं यात राज ठाकरेंचा हातखंडा आहे, असं लोक सांगतात. त्यांच्या प्रभावी भाषणशैलीमुळं त्यांच्या सभेला नेहमीच मोठी गर्दी बघायला मिळते. मात्र, आतापर्यंत या गर्दीचं रुपांतर मतात होताना कमी पाहायला मिळालं. मनोरंजन म्हणून भाषण ऐकणं आणि सभेला गेल्यानंतर मत देणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. राज ठाकरे यांचे जुने सहकारी आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी प्रचार सभेत सहभाग घेतला. कोकणातील सभेत राज यांनी नारायण राणेंचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच राणेंना निवडून देण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी कोकणवासीयांना केलं. मात्र, राज ठाकरेंचं भाषण मतदारांवर प्रभाव पाडू शकेल का? हा खरा प्रश्न आहे.

...त्यामुळं राणेंना फायदा होईल : यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना भाजपा प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, "राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाचा नक्कीच नारायण राणेंना फायदा होईल. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा ते एक लोकप्रिय नेते होते. नारायण राणे आणि राज ठाकरे हे जुने सहकारी असून त्यांनी एकत्र काम केलंय. त्यामुळं राज यांच्या भाषणाचा नक्कीच तिथल्या मतदारांवर प्रभाव पडेल. तसंच नारायण राणे हेच जिंकून येतील", असा विश्वासही यावेळी हाके यांनी व्यक्त केला.

वैचारिक दळभद्रीपणाचं लक्षण : याविषयी विनायक राऊत यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "राज ठाकरेंच्या सभेचा कोकणातील लोकांना काहीच फरक पडणार नाही. भाषणादरम्यान राज ठाकरेंची जीभ घसरली होती. त्यांना 'खुर्चीवर बसणारा मंत्री नको' असं म्हणायचं होतं. मात्र, त्यांनी चुकून 'खुर्चीवर बसणारा खासदार नको' असं म्हटलं. एवढ्या मोठ्या नेत्यांनं बोलताना थोडं तरी भान ठेवायला हवं होतं", अशी टीकाही त्यांनी केली.

'हा' मोठा विरोधाभास : राज ठाकरे यांची भाषणशैली बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आहे. परंतु, त्यांच्या सभेचा मतदारांवर फारसा काही पडेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तसंच जेव्हा नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती. तेव्हा नारायण राणेंचा पराभव करा, असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, आता त्याच नारायण राणेंच्या विजयासाठी राज ठाकरेंना कोकणात सभा घ्यावी लागते आहे. हा मोठा विरोधाभास असल्याचंही माईणकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिली सभा; उद्धव ठाकरेंवर निशाणा, नारायण राणेंचं कौतुक - Raj Thackeray Sabha
  2. 'नकली मोदी भक्त' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर संजय राऊतांनी केली टीका - Lok Sabha Election 2024
  3. उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे नेते 'राज'दरबारी, काय आहे भेटीचं गणित? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.