सातारा Ramraje Nimbalkar On BJP : माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्यांच्या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा रामराजे नाईक-निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर : राज्यात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. महायुतीत गेल्यानंतर मुस्लिम मतदार दुरावला असल्यानं राष्ट्रवादीतील अनेक नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात जात आहेत. साताऱ्यातील फलटणमध्ये विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेवर हल्लाबोल करत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले.
लोकसभेला रामराजेंच्या गटाकडून तुतारीचा प्रचार : महायुतीत भाजपकडे असलेल्या माढा मतदार संघातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंनी कडाडून विरोध केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीत देखील रामराजेंच्या गटाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचेच काम केले. धैर्यशील मोहिते-पाटील विजयी झाल्यानंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजेंच्या निवटवर्तीयांची फोडाफोडी सुरू केली आहे.
माजी खासदाराच्या दहशतीला सपोर्ट करू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (२ सप्टेंबर) फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी फलटणमध्ये झालेल्या बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांविषयी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. आपलं भांडण भाजपासोबत नाही. माजी खासदारासोबत आहे. ते आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्याला सपोर्ट करू नका. अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशाराच रामराजे नाईक निंबाळकरांनी दिला.
हेही वाचा
- "काही लोक साथ तर देतात, मात्र मागून..."; नवनीत राणांचा गद्दारांना टोला - Navneet Rana
- "शिवाजी महाराजांचं नाव घेतात अन् काम औरंगजेब आणि अफजलखानासारखं"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Shivaji Maharaj Statue Collapse
- "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue