ETV Bharat / politics

पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याचा होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश, उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Lok Sabha Election - LOK SABHA ELECTION

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Sharad Pawar) लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केलीय. यात सातारा आणि रावेरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याचा गुरूवारी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 9:25 PM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद (Sharad Pawar Press Conference) घेणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत आणखी एखाद्या नेत्याचा पक्षप्रवेश पुण्यात होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता असल्याची माहिती आहे. मात्र, या नेत्याचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. त्यामुळं या पत्रकार परिषदेकडं सर्वांचे लक्ष लागलं असून शरद पवार आणखी महायुतीला कुठला मोठा धक्का देतात का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मोठा नेत्याचा पक्षप्रवेश होणार : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणुकीकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात होणार आहे. मात्र, नाराजी सुद्धा महायुतीत वाढत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होत आहेत. धैर्यशील मोहिते हे 13 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, तर गुरूवारी आणखी एका नेत्याचा पक्षप्रवेश होणार आहे. तो नेमका कोणता नेता आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नसतं तरी, सोलापूर जिल्ह्यातील 'हा' नेता असल्याचं बोललं जातय.

धैर्यशील मोहिते किंवा आणखी कोण : माढा लोकसभा प्रश्न चर्चेला जात असताना या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत गेलेले रामराजे नाईक निंबाळकर सुद्धा भाजपावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं कदाचित रामराजे निंबाळकर किंवा संजीव राजे यांचासुद्धा पक्षप्रवेश होऊ शकतो. मात्र, हे नाव गुपित ठेवण्यात आलं असून धैर्यशील मोहिते किंवा आणखी कोण हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. मात्र, उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व काही स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड - Sibling Day 2024
  2. राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024
  3. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 'या' दोन जागांवर उमेदवार घोषित, एका जागेचा तिढा कायम - NCP SCP Candidate List

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.