ETV Bharat / politics

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; काळारामाचं दर्शन घेत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार

Raj Thackeray Nashik Visit : मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे ७ ते ९ मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी सकाळी ते प्रसिद्ध श्रीकाळाराम मंदिराला (Nashik Kalaram Mandir) भेट देऊन रामाची महाआरती करतील. त्यानंतर दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाला मार्गदर्शन करणार असून, लोकसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद करणार आहेत.

Raj Thackeray Kalaram Mandir Darshan
राज ठाकरे काळाराम मंदिर दर्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 7:05 PM IST

नाशिक Raj Thackeray Nashik Visit : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा भव्य वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. तत्पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या प्रसिद्ध काळारामाचं दर्शन (Nashik Kalaram Mandir) घेऊन अधिवेशनात लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

असा आहे कार्यक्रम : मनसेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे 7 ते 9 मार्च नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचं 7 मार्च रोजी सायंकाळी शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा येथे त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता काळाराम मंदिरात महाआरती आणि दिवसभर प्रवेश सोहळे तसंच इतर पक्ष कार्यक्रम होतील. 9 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेपासून दादासाहेब गायकवाड सभागृहात अधिवेशन होणार आहे. यात राज ठाकरे हे लोकसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद करणार आहेत. त्यामुळं राज्याचं लक्ष मनसे अधिवेशनाकडं लागलं असल्याचं मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सांगितलं. अधिवेशनानिमित्त शहरात शेकडो कमानी उभारल्या जात असून पक्ष ध्वजानं शहरातील दुभाजक रंगले आहेत.

आधी पंतप्रधान मोदी मग उद्धव ठाकरे आता राज ठाकरे : अयोध्येतील 22 जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सुरूवात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरातून केली होती. तसंच मंदिर परिसरात स्वच्छता करत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील काळाराम मंदिरात सहपरिवार महापूजा केली होती. यानंतर आता राज ठाकरे 8 मार्चला काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील 12 मार्च रोजी काळाराम मंदिराला भेट देणार आहे.

राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम : सुरूवातीपासून राज ठाकरे यांचं नाशिकवर विशेष प्रेम आहे. मनसेच्या सत्ता काळात नाशिकचा विकास झाला. त्यात वाहत्या पाण्यावरील शंभर फुटी कारंजा, बोटॅनिकल गार्डन, होळकर पुलावरील वॉटर कर्टन, शहरातील रिंग रोड यासारखी अनेक कामे झाली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या निधीचा महानगरपालिकेवर भार न पडू देतात मुख्यत्वे भ्रष्टाचार न होता, सर्व कामे झाली असं, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितलं.

म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल : सध्याच्या स्थितीमध्ये अनेक प्रमुख नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाशिकमध्ये कमी झाली आहे, पण संपलेली नाही. त्यामुळं लोकसभा निवडणुकीचा मंच वापरून पक्षाला पुनरुज्जीवित करण्याची संधी राज ठाकरेंकडं आहे, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शहर दौऱ्यावर आले असताना मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं : नाशिक शहरात 2009 मध्ये मनसेचे तीन आमदार, 2012 मध्ये नाशिक महापालिकेवर तब्बल 40 नगरसेवक निवडून देत महानगरपालिकेची सत्ता नाशिककरांनी राज ठाकरे यांना देऊ केली होती. तेच दिवस पुन्हा आणण्यासाठी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मनसेचं होणारं राज्यव्यापी अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे. आता राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही, तर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते इतरत्र पक्षात जातील अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळं लोकसभे नंतरच्या विधानसभा, महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावंच लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईत युवा महाराष्ट्रभिमान मेळावा; लोकसभेसाठी 'मविआ'तील युवा संघटनांही आखणार एकत्रित रणनिती
  2. " निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींचा 'खरा चेहरा'..." इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड करण्यातील दिरंगाईवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
  3. तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही याची खात्री द्या; प्रकाश आंबेडकरांचं आव्हाड यांना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.