ETV Bharat / politics

ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा; उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्केंनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटायला तयार नव्हता. मात्र, आज तो वाद मिटला. कल्याण डोंबिवली मतदार संघातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी घोषित झाली. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोघांनी 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

Lok Sabha Election 2024
श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्केंनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:07 PM IST

प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील महायुतीतील जागा वाटपाचं सूत्र जवळजवळ स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ठाणे कल्याण मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के (Naresh Mhaske) यांना तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. तर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभा होणार : राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे म्हणाले की, पक्षाकडून आज आमच्या दोघांची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालीय. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही शिवतीर्थावर आलो. त्यांनी देखील आम्हा दोघांना भरभरून आशीर्वाद दिला. आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांची भव्य सभा होणार आहे. पहिल्यापासूनच राज ठाकरे यांचं प्रेम आणि सहकार्य आहे.

राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मतदार इच्छुक : राज ठाकरे यांच्या सभेमुळं प्रचारात दिशा देण्याचं काम नक्कीच होतं. तसंच त्यांना ऐकण्यासाठी सर्वात जास्त तरुण पिढी ही पुढे सरसावते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत. आमच्या मतदारसंघातील मतदार देखील त्यांना ऐकण्यास इच्छुक आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा न करता महायुतीला पाठिंबा दिलाय. त्यामुळं मोठ्या मनाने ते महायुतीसोबत जोडले गेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून महायुतीला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिल्यामुळं, मतदार संघातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी कामाला लागले आहेत. राज ठाकरे देखील आपल्या प्रचारानं एक मोठी ताकद म्हणून महायुतीच्या उमेदवारामागे उभे राहतील असा विश्वास, श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय.

आपल्या उमेदवारीनं भाजपात नाराजी नाही : नरेश म्हस्के यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर नरेश मस्के म्हणाले की, असं काही नाही, कोणीतरी अशा बातम्या पसरवत आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपाकडून मतदार संघामध्ये नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे. त्यामुळं शिवसेना आणि भाजपात कोणताही दुरावा नाही.

हेही वाचा -

  1. ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election
  2. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut
  3. कुंभनगरी नाशिकमध्ये चार अध्यात्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढायचं भाजपाच्या तिकीटावर - lok sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.