ETV Bharat / politics

केवळ 22 अरबपतींना नाही, तर कोट्यवधी लोकांना लखपती करणार; राहुल गांधी यांची घोषणा - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षात देशातील केवळ 22 उद्योगपतींना अरब पती करायचं काम केलं आहे. मात्र, आपण देशातील कोट्यवधी गरिबांना लखपती करणार आहे असा दावा, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज अमरावतीत जाहीर सभेत केला आहे. महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकेचा प्रहार केला.

Rahul Gandhi criticized PM Modi
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 4:40 PM IST

Updated : Apr 24, 2024, 5:35 PM IST

सभेत बोलताना राहुल गांधी

अमरावती Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या परतवाडा येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, या देशातील विद्यमान सरकारनं आणि भाजपानं संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. संविधान बदलण्याचा डाव केलाय. आजपर्यंत कोणीही अशा पद्धतीनं संविधान बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं ही निवडणूक संविधान वाचवण्याची आहे, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील गरीब आणि दलितांचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, या वर्गाचा आवाज कोण दाबतोय तो आम्ही पाहणार आहोत, असा इशाराच त्यांनी यावेळी दिलाय.

22 लोकांसाठी सरकार राबते आहे : देशातील कोट्यवधी लोकांच्या कल्याणासाठी नाही तर केवळ 22 उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी मोदी सरकार गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. देशातील 70 कोटी लोकांकडं जितकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती या 22 लोकांकडं आहे. नरेंद्र मोदींनी असा देश तयार केला आहे, नरेंद्र मोदींनी शेतकरी आणि विद्यार्थी यांचं किती कर्ज माफ केलं, असा सवाल उपस्थित करीत या केवळ 22 लोकांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले गेले, असा दावा त्यांनी केलाय.

गरीब कुटुंबाची यादी करणार : आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज जेवढं माफ केलं ते जर 25 वेळा माफ केलं तर एकूण मिळून या उद्योगपतींचं कर्ज माफ केल्याची रक्कम होते. यापुढं आता असं होणार नाही, देशातील गरीब परिवाराची आम्ही यादी तयार करणार आहोत, या गरीब परिवारातील एका महिलेला निवडणार आहोत आणि त्या महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळं प्रत्येक महिन्यात महिलेच्या खात्यात साडेआठ हजार रुपये आणि वर्षाला एक लाख रुपये कोट्यवधी महिलांच्या खात्यात येणार आहेत. तुम्ही देशात केवळ 25 अरबपती तयार करा, आम्ही करोडो लखपती करणार,असं आव्हान राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारला दिलं. घरात 24 तास सन्मानाने काम करणाऱ्या महिलेला तिचा अधिकार मिळवून देणार आहे, असंही ते म्हणाले.

महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण : यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिलांना सरकारी नोकरीत 50% आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार असून मोदींनी देशातील तरुणांना फसवलं आहे, नोटबंदी आणि जीएसटी लागू करून बेरोजगारी वाढवली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशातील सर्व पदवीधारकांना प्रशिक्षणार्थी म्हणजेच अप्रेंटीशीपची नोकरी एक वर्षासाठी दिली जाईल, देशातील श्रीमंत लोकांना आपल्या मुलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतात, त्याच सुविधा गरिबांच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रात एक वर्षासाठी ही अप्रेंटीशीप देण्यात येणार असून ज्यांना पदवीनंतर अप्रेंटीशीप मिळणार नाही, त्यांच्या खात्यात एक लाख रुपये देण्यात येतील, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

शेतकऱ्यांसाठी विशेष आयोग स्थापन करणार : यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी देशात विशेष आयोग स्थापन केला जाईल, अशी ग्वाही दिली. हा आयोग सातत्याने शेतकऱ्यांच्या आणि पिकांच्या परिस्थितीचा अहवाल घेईल जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. अरबपती लोकांचं कर्ज माफ होऊ शकतं, तर गरिबांचं का होऊ शकत नाही? त्यामुळं देशातील सर्व गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गरिबांचा सत्तेत वाटा नाही : या देशातील गरीब आदिवासी आणि वंचित समाज सत्तेमध्ये भागीदार नाही. देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या 90 अधिकाऱ्यांमध्ये केवळ एक अधिकारी आदिवासी, तीन अधिकारी दलित आणि तीन अधिकारी ओबीसी असल्याचा दाखला देत राहुल गांधी यांनी सत्तेतही गरिबांना अधिकार नाही, असा दावा केलाय.

जातीय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण : देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळण्यासाठी जातीय जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सत्तेत येताच जातीय जनगणना करणार आहोत आणि आर्थिक सर्वेक्षणही करणार आहोत. भारताचा एक्स-रे काढायचा आहे आणि जातीय जनगणनेच्या माध्यमातूनच तो निघणार आहे. महालक्ष्मी योजना आणि अप्रेंटीशीप योजनेनंतर भारताचा चेहरा बदलणार आहे. तुम्हाला तुमची ताकद समजू नये म्हणून संविधान बदलण्याचा डाव आहे. मात्र, संविधान हे पुस्तक नाही, तर ते गरिबांचं शस्त्र आहे, असा इशाराही यावेळी राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपाला दिलाय.

हेही वाचा -

  1. अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण - Rahul Gandhi Rally
  2. "नरेंद्र मोदी है चमकता तारा और चुनाव मे हम राहुल गांधी के..."; रामदास आठवलेंची त्यांच्या शैलीत कविता, उपस्थितांमध्ये 'हास्यकल्लोळ' - Ramdas Athawale Poem
  3. 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally

Last Updated : Apr 24, 2024, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.