ETV Bharat / politics

"नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुगातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) कराडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कॉंग्रेसनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
पृथ्वीराज चव्हाण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 10:42 PM IST

Updated : Aug 27, 2024, 10:58 PM IST

सातारा Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला घेरलंय. "भाजपा सरकारला लोकसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळा अनावरणाचा इव्हेंट करायचा होता. म्हणून सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा उभारताना नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला," असा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

शिवरायांच्या प्रतिमेचा इव्हेंटसाठी वापर : "शिवरायांच्या प्रतिमेचा केवळ इव्हेंटसाठी वापर केला गेला. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. पुतळ्याच्या मूळ टेंडरमध्ये कामाचा कालावधी किती होता? उद्घाटनाची तारीख कोणी ठरवली? ओतीव आणि भरीव पुतळा तयार होणार असताना पत्र्याचा पुतळा का केला गेला? त्यासाठी कोणी निर्देश दिले, असे अनेक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. नौदलाच्या जागेवर पुतळा उभारला होता. परंतु, सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची होती, असंही ते म्हणाले.

सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे : लोकसभा निवडणुकीपूर्वी इव्हेंट करता यावा. पंतप्रधानांना तिथं येऊन भाषण करता यावं, म्हणून हा निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच नौदलाची जबाबदारी असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यातील मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही ते म्हणाले.

भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता सोडणार नाही : छत्रपती शिवरायांच्या संदर्भात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला महाराष्ट्रातील जनता कधीही सोडणार नाही, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. "शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणी तरी प्रायश्चित करणं गरजेचं आहे. सत्तेच्या खुर्चा उबवताय. मोठमोठे भ्रष्टाचार करताय. किमान छत्रपती शिवारायांना तरी भ्रष्टाचारातून सोडा," असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

सरकार निवडून देणाऱ्या नागरीकांना प्रश्चाताप होईल : पृथ्वीराज चव्हाण पुढं म्हणाले की, "आपण कुठलं सरकार निवडून दिलंय, याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न झाला. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेतील बड्या आसामींना वाचविण्याचा प्रयत्न केला. आता या बाबतीत कुणाला वाचवायचा प्रयत्न केला, तर जनता त्यांना माफ करणार नाही," असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा

  1. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आशिष शेलारांनी मागितली माफी, तर फडणवीस म्हणाले, "कोथळा बाहेर काढू" - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. "मालवणमधील 'तो' पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा..."; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; वाद पेटणार? - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 वर्षांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ला आजही दिमाखात उभा; कशी आहे त्याची रचना? - Chhatrapati Shivaji Maharaj Forts

Last Updated : Aug 27, 2024, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.