ETV Bharat / politics

काँग्रेसला दिली कारल्याची उपमा, तर नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; चंद्रपूरच्या सभेत मोदींची चौफेर फटकेबाजी - PM Narendra Modi Chandrapur Sabha - PM NARENDRA MODI CHANDRAPUR SABHA

PM Narendra Modi Chandrapur Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (8 एप्रिल) चंद्रपुरात सभा पार पडली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीसह कॉंग्रेस आणि ठाकरे गटावर तुफान फटकेबाजी केली.

PM Narendra Modi Chandrapur Sabha Modi criticized Congress Uddhav Thackeray and NDA
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 6:19 PM IST

Updated : Apr 8, 2024, 7:54 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर सभा

चंद्रपूर PM Narendra Modi Chandrapur Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज (8 एप्रिल) चंद्रपुरात (Chandrapur) पार पडली. भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी ते तब्बल 10 वर्षांनी आज चंद्रपुरात (Modi in Chandrapur) आले होते. यावेळी बोलत असताना मोदींनी इंडिया आघाडीसह, कॉंग्रेस आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

मराठीत केली भाषणाची सुरुवात : मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले की, "माता महाकालीच्या पावनभूमीत शक्तीला नमन करतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. उद्यापासून गुढीपाडवा नवं पर्व सुरु होतं असून सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा." तसंच यावेळेस फिर एक बार मोदी सरकार, चंद्रपुरकरांनी मन बनवलंय, असंही ते म्हणाले. यावेळी चंद्रपुरातील लाकडांचा वापर करुन राम मंदिर बनवल्याचा उल्लेखही मोदींनी केला.

इंडिया आघाडीवर हल्लाबोल : इंडिया आघाडीवर टीका करत मोदी म्हणाले की, "ही लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा असून एकीकडं भाजपा आणि एनडीए आहे. तर दुसरीकडं काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी आहे. भाजपा आणि एनडीए सदैव देशासाठी हिताचे निर्णय घेतात. मात्र, सत्ता भोगा आणि मलाई खा हे एकमेव इंडिया आघाडीचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राऐवजी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात इंडिया आघाडीचं सरकार होतं, तोपर्यंत महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली", असा गंभीर आरोप नरेंद्र मोदींनी केला. तसंच विरोधकांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचाच विकास केला. त्यांनी सातत्यानं महाराष्ट्रातील विकासकामांना विरोध केला. पण, मोदी सरकारनं महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सर्व योजना सुरु केल्या, असंही ते म्हणाले.

कॉंग्रेसला दिली कारल्याची उपमा : यावेळी बोलत असताना मोदींनी कॉंग्रेसला कारल्याची उपमा दिली. 'कडु कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडूच', हे उदाहरण काँग्रेससाठी तंतोतंत लागू पडतं असल्याचं ते म्हणाले. दहशतवाद्यांना कॉंग्रेसनं संरक्षण दिलं, तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नकली शिवसेना म्हणत ठाकरेंना डिवचलं : पुढं मोदींनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा (ठाकरे गट) उल्लेख नकली शिवसेना असा केला. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढं नेत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. वाघांच्या भूमीत पंतप्रधान मोदींचा आवाज, जाणून घ्या भाजपासाठी का महत्वाची आहे चंद्रपूर लोकसभा - Lok Sabha Election 2024
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातुन फुंकणार राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग; पाहा व्हिडिओ - PM Narendra Modi in Chandrapur
  3. महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये पहिली सभा घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी केली सोशल मीडियात पोस्ट, "म्हटले... - PM Modi Chandrapur Rally

Last Updated : Apr 8, 2024, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.