ETV Bharat / politics

विरोधकांकडून फेक व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - PM Modi Dharashiv visit - PM MODI DHARASHIV VISIT

PM Modi Dharashiv visit पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिवमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. विरोधकांकडून फेक व्हिडिओ तयार केले जात असल्याचा त्यांनी यावेळी गंभीर आरोप केला.

PM Modi Dharashiv visi
PM Modi Dharashiv visit
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 2:04 PM IST

धाराशिव PM Modi Dharashiv visit - पंतप्रधान मोदी यांनी फेक व्हिडिओवरून काँग्रेसवर निशाणा साधला. फेक व्हिडिओ तयार करण्याचं विरोधकांकडून काम सुरू असल्याचा आरोप केला. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीनं अयोध्येचं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे?

  • जलशिवार योजना कोणी बंद केली?
  • मोदी कधीच समस्यांपासून पळत नाही. मोदी समस्यांना सामोरे जातो. मोदींनी १० वर्षात महाराष्ट्रात पाणी दिले.
  • मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कोणी थांबविली?
  • विरोधकांनी तुमच्यापर्यंत पाणी येणे थांबविले.
  • तुळजाभवानीचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
  • काँग्रेसचा निधी पंजा हिसकावयचा.
  • दीड लोख कोटींची सबसिडी शेतकऱ्यांना दिली.
  • काँग्रेसची लूटमार बंद केली. काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या वाट्याचे निधी पळवायचे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काय आहे स्थिती? उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मागील निवडणुकीत विद्यमान खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते ओमराजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढविलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील हे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचे नेते होते. भाजपा नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मतदारसंघात कोणत्या आहेत समस्या? 2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या 1,657,576 आहे. त्यापैकी 8,61,535 पुरुष आणि 7,96,041 महिला आहेत. शेतीप्रधान लोकसंख्या असलेल्या उस्मानाबादमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यात पुरेसे जलसिंचन न झाल्यानं शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. या मतदारसंघात औद्योगिक विकास झाला नसल्यानं मतदारांमध्ये नाराजीची भावना आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.