मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताधारी पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएम मशीनवरून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. आरोपांवर आता निवडणूक आयोगाच्या वतीनं महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
मतमोजणीत कुठेही तफावत नाही : राज्यात महायुती सत्तेत आली असून, महाविकास आघाडी विरोधात बसली आहे. निकालानंतर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विशेष अधिवेशनात देखील हा विषय गाजला असून, विरोधकांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवरील मतदानाचा मुद्दा उचलून धरला होता. आता या वादावर निवडणूक आयोगानंच स्पष्टीकरण दिलं. ईव्हीएम मशीमध्ये आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचं स्पष्ट केलं.
PRESS NOTE@ECISVEEP @SpokespersonECI pic.twitter.com/LyeINzEV00
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) December 10, 2024
विसंगती आढळली नाही : "सर्व 288 विधानसभा क्षेत्रांमध्ये 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीच्या दिवशी एकूण 1445 VVPAT स्लिप्सची मोजणी करण्यात आली आणि त्यांच्या संबंधित EVM क्रमांकांशी जुळणाऱ्या कोणत्याही VVPAT स्लिपमध्ये कोणतीही विसंगती आढळली नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी दिली.
आयोगानं पत्रक केलं जारी : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगानं एक पत्रक जारी केलं. या पत्रकात आयोगानं व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीत कोणतीच तफावत नसल्याचं म्हटलं आहे. आयोगानं विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ किंवा विभागातून ५ मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगानं निवडलेल्या या ५ मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार मोजणी करण्यात आली होती. यात कोणतीही तफावत आढळलेली नाही, असं निवडणूक आयोगानं सांगितलं.
हेही वाचा -