ETV Bharat / politics

विकासाचं विकेंद्रीकरण करणं हा ‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’चा उद्देश– नितीन गडकरी

Nitin Gadkari News : असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटच्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव–अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा सोमवारी (29 जानेवारी) थाटात समारोप झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या विकासाबाबत मत व्यक्त केलं.

nitin gadkari said that decentralization of development is the aim of advantage vidarbha
विकासाचे विकेंद्रीकरण करणे हा ‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’चा उद्देश– नितीन गडकरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 10:14 AM IST

नागपूर Nitin Gadkari News : विकासाचे विकेंद्रीकरण करणं हा ‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’चा मुख्‍य उद्देश आहे. काही प्रमाणात हा उद्देश यशस्वी झालाय. पुढील वर्षी प्रत्‍येक जिल्‍ह्याचं स्‍वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्‍थान देण्‍यात येईल. त्‍यामुळं प्रत्‍येक जिल्‍ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगानं धावेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला आहे. दरम्यान, विदर्भात गुंतवणूकदार यावं, येथील उद्योगाचा विकास व्‍हावा. त्‍यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्‍हावा, या उद्देशानं या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते.

आपली ताकद आणि कमजोरी लक्षात आली : अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भामुळे विदर्भाची ताकद आणि कमजोरी लक्षात आली. कमजोरीवर काम करून त्‍याचं ताकदीमध्‍ये परिवर्तन करण्‍याचे प्रयत्‍न केले जातील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्‍यक्‍त केला. पुढील महोत्‍सव आणखी मोठ्या प्रमाणात आयोज‍ित केला जाईल, असंही नितीन गडकरी म्‍हणाले. विदर्भात इंडस्‍ट्रीसाठी इकोसिस्‍टीम असल्‍याचं या महोत्‍सवातून लक्षात आलं. यादरम्यान अनेक सामंजस्‍य करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

रोजगार निर्मितीचे व्‍यासपीठ ठरेल : यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’ मध्‍ये चांगल्‍या चर्चा झाल्‍या आहेत. उत्‍पादनं प्रदर्शित झाली आहेत. सुंदर स्‍टार्टअप बघायला म‍िळाले. तसंच अनेक सामंजस्‍य करार झाले. विदर्भाचे औद्योग‍िकरण व्‍हावे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी याकरीता आयोज‍ित करण्‍यात आलेला हा महोत्‍सव मैलाचा दगड ठरलेला आहे. या महोत्‍सवामुळं विदर्भाची उद्योग क्षेत्रातील जमेची बाजू बाहेरच्‍या लोकांना लक्षात आली आहे. पहिल्‍याच वर्षी झालेल्‍या या यशस्‍वी आयोजनामुळे भविष्‍यात ‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे मोठे व्‍यासपीठ ठरेल", असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

खासदार औद्योगिक महोत्‍सव अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भमुळे नागपूर, विदर्भातील उद्योगांची ताकद कळली. इतर राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्‍ट्र पर्यटनदृष्‍ट्या मागासलेला असून सर्वसमावेश पर्यटन धोरण आखल्‍यास देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येईल. पर्यटन वाढल्‍याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पर्यटन व्‍यवसायाला बळकटी म‍िळेल- गिरीश महाजन, पर्यटन मंत्री

रामचरण ग्रुप आणि सियानमध्‍ये सामंजस्‍य करार : दरम्यान, महोत्‍सवाच्‍या तीन दिवसांमध्‍ये अनेक सामंजस्‍य करार करण्‍यात आले. समारोपीय सत्रात त्‍यात आणखी एका कराराची भर पडली. रामचरण ग्रुप ऑफ चेन्‍नई व सियान नागपूर यांच्‍यात ‘टेक्‍नॉलॉजी ट्रान्‍सफर फॉर सीओटू’ संदर्भात सामंजस्‍य करार करण्‍यात आला. रामचरण ग्रुपचे कौशिक पलिचा आणि सियान अ‍ॅग्रोचे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांनी या करारावर स्‍वाक्षरी केली.

हेही वाचा -

  1. शरद पवारांच्या कामांचं नितीन गडकरींकडून कौतुक; 'डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार' शरद पवार यांना बहाल
  2. Gadkari trailer launch : देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी राज कपूरसारखे का वाटतात? 'गडकरी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मिळालं उत्तर
  3. Rahul Chopra in role of Nitin Gadkari : 'गडकरी' चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.