नागपूर : राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच लाखो लाडक्या बहिणींचे लाडके 'देवा भाऊ' यांचे हजारो फोटो तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र, कधी काळी याच देवा भाऊने खास मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून विशेष फोटो शूटही करून घेतलं होतं. हे मॉडेलिंगचे फोटो पाहिलेत का? बघा....
मित्रांच्या आग्रहाखातर केलं मॉडेलिंग : राजकीय प्रचाराच्या होर्डिंगवर हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा असलेल्या 'देवा भाऊं'चे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. टीव्हीवर आणि प्रत्यक्षातही तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळेला पाहिले असेल. मात्र, याच देवा भाऊंनी कधीकाळी मॉडेलिंगही केली होती हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. "देवेंद्र फडणवीस यांनी एका खास प्रसंगात मॉडेलिंगसुद्धा केली होती. तीही आपल्या खास मित्रांच्या आग्रहाखातर केली होती, अशी माहिती फडणवीस यांचे मित्र विवेक रानडे यांनी दिली.
मॉडेल म्हणून फोटो शूट : "२००४ च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या नागपुरातील मित्रांनी मॉडेलिंग करण्याचा आग्रह केला होता. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यासाठी तयार झाले नाहीत. मात्र, नंतर मित्रांच्या हट्टापायी त्यांनी होकार दिला आणि नागपूरचे फैशन फोटोग्राफर विवेक रानडे यांच्या स्टुडियोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मॉडेल म्हणून फोटो शूट झालं होतं. याबाबतची माहिती खुद्द विवेक रानडे यांनीच दिली
जाहिरातीसाठी केली मॉडेलिंग : आकर्षक ब्लेझर, रंगीत शर्ट, टी शर्ट, कुर्ता अशा विविध ड्रेसेसमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे फोटो शूट पार पडले होते. सुरुवातीला मॉडेल म्हणून कॅमेरासमोर फडणवीस काहीशे संकोचले होते. मात्र, फडणवीसांनी एकापेक्षा एक पोझ देत फोटो शूट केलं. एका राजकीय नेत्याचा मॉडेल म्हणून झालेला तो पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता. त्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या विशिष्ट पोशाखातील होर्डिंग्स नागपुरात विविध ठिकाणी लागले होते. त्याला नागपूरकरांनी जोरदार पसंती दिली होती, अशी आठवण विवेक रानडे यांनी सांगितली.
देवेंद्र फडणवीसांची मॉडेलिंग अटल बिहारी वाजपेयींना भावली : विशेष म्हणजे, दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या त्या फोटोजला पाहून त्यांना फोन केला आणि दिल्लीला बोलावून घेतलं होतं. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अटल बिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांना बघून 'मॉडेल आमदार' अशी प्रेमाने हाक मारली होती, अशीही आठवण विवेक रानडे यांनी सांगितली.
हेही वाचा -