ETV Bharat / politics

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा घंटानाद, रोहित पवार यांची ईडी कार्यलयात पुन्हा चौकशी - शरद पवार

Mla Rohit Pawar : राष्ट्र्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

Mla Rohit Pawar
रोहित पवार ईडी चौकशी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 6:22 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा घंटानाद

मुंबई Mla Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी सुरू आहे. त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्ते, पदाधिकारी जमले आहेत. रोहित पवार यांची ईडी चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोरून हटणार नसल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

आजी देखील पक्ष कार्यलयात पोहचल्या : आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणात दुसऱ्यांदा ईडी कार्यलयात चौकशी होत आहे. रोहित पवार यांच्या 24 जानेवारीच्या चौकशीच्या वेळी पाठिंब्यासाठी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे पक्ष कार्यालयात ठाण मांडून होते. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत आहेत. याच कारणाने नातवाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आजी प्रतिभाताई शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले आहेत. रोहित पवार यांची ईडी चौकशी होईपर्यंत त्या पक्ष कार्यालयातच ठाण मांडून असणार आहेत. त्यामुळं रोहित पवार यांच्या आजी चक्क मैदानात उतरल्याने वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

मी आधी व्यवसायात आलो नंतर राजकारणात : ईडी चौकशीसंदर्भात रोहित पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणाले, "19 तारखेला मला ईडीने नोटीस पाठवली. मला माध्यमांकडून समजत आहे की, क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर झाला आहे. आम्ही न्यायालयाला पत्र देणार आहोत की, आम्हाला देखील तो क्लोजर रिपोर्ट मिळावा. ज्यावेळी एखाद्या केसमध्ये कोणतेही तथ्य नाही अशावेळी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला जातो. ईडी अधिकारी आपलं काम करत आहेत. त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात मी नाही. नोटीस आली आहे, त्यांना माहिती देण्याची आपली जबाबदारी आहे. व्यवसायात मी कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही. मी प्रथम व्यवसायात आलो नंतर राजकारणात आलोय. मात्र अनेक असे नेते आहेत ज्यांनी राजकारणात येऊन नंतर व्यवसाय सुरू केला. लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम काही लोक करतायत का काय? अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण होत आहे."

ते पळकुटे आम्ही नाही : रोहित पवार ईडी चौकशी दरम्यान केल्या जाणाऱ्या शक्तीप्रदर्शनाला पॉलिटिक शो असल्याचं अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी म्हंटलं होतं. त्याला शरद पवार गटानं प्रतिउत्तर दिलं आहे. त्यांच्यासारखे केंद्रीय एजन्सीच्या भीतीनं पळून गेले ते पळपुटे आहेत, आम्ही नाही असा टोला अमोल मातेले यांनी लागवला.

हेही वाचा -

  1. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून मंत्री अनिल पाटील यांनी डिवचलं, तर राष्ट्रवादीचं उद्या घंटानाद आंदोलन
  2. "रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करताय", उमेश पाटलांची जोरदार टीका
  3. ईडीच्या फेऱ्यात मविआ नेते; रोहित पवार यांच्यानंतर संदीप राऊतांना समन्स तर किशोरी पेडणेकरांची आज होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.