ETV Bharat / politics

'गोदावरी नदी'त कोण लगावणार विजयाची 'डुबकी'? खासदार गोडसे हॅट्रीक करणार की भाजपाचं फुलणार कमळ? - खासदार गोडसे

Nashik Loksabha Constituency : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारसंघात जागावाटपावरुन चर्चा सुरू आहे. तसंच काही इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात तयारीही सुरू केलीय. नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे हॅट्रीक करणार की, आणखी कोणी बाजी मारणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

'गोदावरी नदी'त कोण लगावणार विजयाची 'डुबकी'? खासदार गोडसे हॅट्रीक करणार की भाजपाचं कमळ फुलणार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 11:45 AM IST

नाशिक Nashik Loksabha Constituency : नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या हॅट्रिकला ब्रेक लावण्यासाठी सत्ताधारी मित्र पक्ष भारतीय जनता पक्षानं दंड थोपटले आहेत. त्यातच आता यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनं (अजित पवार) देखील उडी घेतली असून विद्यमान खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांची हॅट्रिक होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

निवडणूक होणार चुरशीची : बहुतांश मतदारसंघात विद्यमान खासदारांना पक्षाकडून ती जागा सोडण्याची पद्धत आहे. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघात तर शिवसेनेच्या खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी जोखीम पत्करुन शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिवसेना दावेदार असतानाच नाशिकची लोकसभेची जागा भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवरुन प्रयत्न सुरू आहेत. सत्तेत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानंही उडी घेतलीय. दुसरीकडे महाविकास आघाडीतही ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्यानं स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळं यंदाची नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

भाजपाला जागा मिळावी : नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपाकडं होता. मात्र 1995 च्या सुमारास शिवसेनेच्या राजाराम गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपानं दिंडोरी मतदारसंघावर लक्ष दिलं. तेव्हापासून ही अदलाबदल कायम आहे. आता राज्यातील सत्ता समीकरण बदलली आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानं एकनाथ शिंदे यांची ताकद कमी झालीय असं भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर ही जागा भाजपाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार असून त्यात शिवसेना कुठंही नाही. त्यामुळं लोकसभेची जागा भाजपाला मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींना स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पत्र दिले आहेत. त्यात आता शिंदे गटाकडून नाशिकची जागा घेऊन त्या बदल्यात धुळ्याची जागा त्यांना देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपा, सेनेत स्पर्धा सुरू असतांना अजित पवार गटानं देखील या जागेवर दावा केला आहे. ही जागा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीतदेखील स्पर्धा असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात गेले असले तरी ही जागा ठाकरे गटाकडे कायम राहील, असं चित्र आहे. एकूणच सर्वच पक्षात जागावाटपाबाबत रस्सीखेच होणार असली तरी खरी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीत होणार आहे.

कोणाची नावं चर्चेत : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, ठाकरे गटाकडून विजय करंजकर, भाजपाकडून आमदार राहुल ढिकले, दिनकर पाटील, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ राहुल आहेर, नितीन ठाकरे, अनिल जाधव, स्वामी कंठानंद, अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, निवृत्ती अरिंगळे, विष्णूपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून गोकुळ पिंगळे, स्वराज पक्षाचे छत्रपती संभाजी राजे भोसले, अपक्ष उमेदवार बाबाजी भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज यांची नावं चर्चेत आहेत.

मनसेच्या एंट्रीनं निवडणुकीत वाढणार रंगत : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास हा नाशिककरांनी दाखवला होता. त्यावेळी नाशिककरांनी मनसेला तीन आमदार आणि महानगरपालिकेत सत्ता दिली होती. त्यावेळी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. आता पुन्हा मनसेकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीला वेग आला आहे. राज ठाकरे यांनी नाशिकला येऊन काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला होता. येत्या 9 मार्च रोजी होणाऱ्या मनसेच्या राज्य अधिवेशनात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं मनसेचे पदाधिकारी सक्रिय झाल्यानं नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिकच चुरशीची होणार हे नक्की.

हेही वाचा :

  1. अमित शाह यांनी बैठक घेऊनही जागा वाटपाची बैठक निष्फळ? भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची रखडली यादी
  2. वर्धा लोकसभा मतदारसंघ : 'महात्मा गांधींच्या कर्मभूमी'त तिसऱ्यांदा कमळ फुलणार? काय असेल लोकसभेचं समीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.