ETV Bharat / politics

नरहरी झिरवळ आमच्या पक्षात या; जितेंद्र आव्हाड यांनी दिली ऑफर - Dhangar Community Reservation - DHANGAR COMMUNITY RESERVATION

Dhangar Community Reservation : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आपल्या पक्षात येण्याचं आवाहन केलय. जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Narhari zirwal
नरहरी झिरवळ (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 6:12 PM IST

Updated : Sep 30, 2024, 7:57 PM IST

मुंबई Dhangar Community Reservation : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सत्ताधारी पक्षासोबत जाणं पसंत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तेव्हापासून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असते. खरं तर आता पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांना पवारांच्या राष्ट्रवादीत खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आपल्या पक्षात येण्याचं आवाहन केलय. तसंच जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आव्हाडांचाही धनगरांच्या आंदोलनाला पाठिंबा : धनगर समाजाने आदिवासी समाजातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावरूनच आता आदिवासी समाजाच्या राज्यातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली आमदार निवास ते मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून बेमुदत आंदोलन केलं होतं. सदर आंदोलनात राज्यातील आदिवासी समाजाचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदार उपस्थित होते. मोर्चा गांधी पुतळ्याकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली गाडी थांबवत आपलादेखील धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी त्यांनी नरहरी झिरवळ यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या, अशा प्रकारचं आवाहन केलंय.

त्यांनी त्यांचं मत मांडलं - झिरवळ : जितेंद्र आव्हाडांच्या आवाहनावर नरहरी झिरवळ म्हणाले की, त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे, त्यावर मी काय बोलणार, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. एका बाजूला नरहरी झिरवळ संविधानिक पदावर असताना आदिवासींच्या हक्कासाठी सरकार दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी न्याय मागत आहेत. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या स्वगृही परतण्याबाबतच्या आवाहनामुळे नरहरी झिरवळ अजित पवारांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात नरहरी झिरवळ यांच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

...तर आम्ही सर्व सोडून जातो - आव्हाड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांना आवाहन केलं होतं. शरद पवारांना बडव्यांनी घेरलं असून, त्यांना बाजूला सारा आम्ही सोबत येऊ, असं त्यावेळी छगन भुजबळ म्हणाले होते. तेव्हासुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक आवाहन करत तुम्ही सर्व परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो. आम्ही जर विठ्ठलाभोवती बडवे असू, तर यापुढे आम्हाला काही नको, आम्ही सर्व सोडून जातो, असंदेखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे.

हेही वाचाः

गाईला राज्यमातेचा दर्जा; पालन पोषणासाठी अनुदान योजना, देवेंद्र फडणवीस म्हणतात...

"एन्काऊंटर केलं, आता तुमचं राजकीय एन्काऊंटर होईल...", मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा

Last Updated : Sep 30, 2024, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.