नंदुरबार Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आलीय. त्याचबरोबर उमेदवारांची देखील चाचपणी करण्यात येत आहे. गेल्या दोन टर्मपासून नेतृत्व करीत असलेल्या खासदार हिना गावित (Heena Gavit) यांना शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी उघडपणे विरोध केलाय. वरिष्ठांना उमेदवार बदलावा अन्यथा शिवसेना बगावत करेल असं सांगण्यात आलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील मतदार माझ्यासोबत : खासदार हिना गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे भाजपाचे पारंपारिक विरोधक असल्यामुळं ते मला नेहमीच विरोध करत असतात. त्यामुळं पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडं लक्ष देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील मतदार माझ्यासोबत आहेत आणि माझ्या कामाची मला पावती मिळेल असा देखील दावा, खासदार हिना गावित यांनी व्यक्त केलाय. याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणाले की, खासदार हिना गावित यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास केला आहे. त्याचबरोबर केंद्राच्या विविध योजना या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यास काम त्यांनी केलाय, त्यामुळं भाजपा पुन्हा त्यांचाच विचार करेल असा दावा त्यांनी केलाय.
हिना गावित यांच्या उमेदवारीला मित्रपक्षांचा विरोध : राज्यात महायुतीची सत्ता असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र महायुतीत बिघाडी होताना दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यमान खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला स्पष्टपणे विरोध केलाय. पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आलं आहे की, उमेदवार बदल्यास आम्ही महायुतीसोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. भाजपा, शिवसेना राष्ट्रवादीचे नंदुरबारमध्ये विळा भोपळ्याचं नाते आहे. विद्यमान खासदार हिना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, हिना गावित यांच्या लहान भगिनी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित विकास कामे जिल्ह्यात राबवित असतात. मात्र यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात असल्यामुळं, खासदार हिना गावित यांच्याबद्दल प्रचंड रोष या दोन्ही पक्षात आहे.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पारंपारिक विरोधक : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून मला विरोध करणारे एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे चंद्रकांत रघुवंशी. राज्यात सत्ता युती आली म्हणून ते शिवसेनेत आले. ते स्वताच्या फायद्यासाठी शिवसेनेत आले आहेत ते कॉंग्रेसमध्ये असतांना नंदुरबार नगरपालिकेत सत्तेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा प्रवेशाचा नावाखाली नंदुरबार शहरासाठी निधी आणला. ते मुख्यमंत्री शिंदे यांना फसवतील ते धोकेबाज असल्याचा प्रत्यारोप शिवसेना नेते रघुवंशी यांचावर लावला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गावित परिवाराचे पारंपारिक विरोधक असल्यामुळं ते माझ्या उमेदवारीला विरोध करीत आहेत.
पुन्हा भाजपा उमेदवार विजयी होणार : केंद्रातील प्रत्येक योजना ही नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याचं काम खासदार हिना गावित यांनी केलंय. गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील सर्वांगीण विकास करून प्रत्येक मतदाराच्या मनात घर केलंय. त्यामुळं प्रत्येक मतदार हा खासदार हिना गावित यांच्याच मागे खंबीरपणे उभा असल्याचा दावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलाय. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात त्यांनी गेल्या दहा वर्षात जो विकास केला आहे तो कोणीही करू शकला नाही. त्यामुळं भाजपा पक्ष पुन्हा खासदार हिना गावित यांनाच संधी देतील. तसेच त्यांना या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर नक्कीच केंद्रीय मंत्री पद देखील मिळेल असा विश्वास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व्यक्त केलाय.
हेही वाचा -