ETV Bharat / politics

'देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहावा, मी थिएटर बुक करतो'; नाना पटोलेंची टोलेबाजी - Nana Patole On Devendra Fadnavis - NANA PATOLE ON DEVENDRA FADNAVIS

Nana Patole On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन अशी टीका केली होती. या टीकेलाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Nana Patole Says will book theatre for Devendra Fadnavis to watch Munna Bhai MBBS movie
नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 8:36 PM IST

नाना पटोले यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

मुंबई Nana Patole On Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दिलीप माने यांच्यासह वंचितचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी आज (31 मार्च) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासह कॉंग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली.

काय म्हणाले नाना पटोले? : "राहुल गांधी हे जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील, तर मी अख्खं थिएटर बुक करेल," असं फडणवीस म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देत नाना पटोले म्हणाले की, "त्यांच्या माहितीसाठी सांगतो मोदींवर काढलेला चित्रपट फ्लॉप झाला, सावरकरवर आणि गोडसेंवर काढलेला चित्रपट फ्लॉप झाला. हायवे मॅन नितीन गडकरी यांच्यावर चित्रपट काढला तो फ्लॉप झाला. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना माझा सल्ला आहे की त्यांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहावा, त्यासाठी मी थिएटर बुक करतो", अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींशी तुलना होऊ शकत नाही : पुढं ते म्हणाले की, "खरं तर ते राज्यकर्ते असून अशा प्रकारच्या टिंगल-टवाळी करण्यापेक्षा त्यांनी राज्यातील पाणीटंचाई, बेरोजगारी, महागाई अशा जनतेच्या मूळ प्रश्नांकडं लक्ष द्यावं. दिल्लीचं ऐकायचं आणि त्याआधारे चालायचं अशा प्रकारचं काम राहुल गांधींनी कधीच केलं नाही. मणिपूर ते मुंबई अशा हजारो किलोमीटरच्या यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या राहुल गांधींशी तुमची तुलना होऊ शकत नाही."

राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू : "राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. इंदापूर येथील घटना संपूर्ण देशानं पाहिली आहे. केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करु नका. महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचं आहे",असं ते म्हणाले. तसंच मत विभाजनाचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -

  1. 'पंतप्रधान मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी 'मॅच फिक्सिंग'चा प्रयत्न', रामलीला मैदानातून राहुल गांधींचा घणाघात - INDIA Bloc Maharally LIVE Updates
  2. आमचं ऑपरेशन लोटस माध्यमांनाही माहिती नसतं, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
  3. 'आमचं बँक खातं नाही तर लोकशाही गोठवली'; निवडणूक रोख्यांवरुन काँग्रेस आक्रमक - Congress Press Conference

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.