नागपूर : महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ हा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही आता पूर्ण झाल्यानंतर कुणाच्या पारड्यात कुठे काय आणि कोण पडलं आहे, याचा आढावा घेतला असता एक बाब मात्र, प्रकर्षानं पुढे आली. ती म्हणजे पूर्व विदर्भातील एकूण ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असाचं सामना रंगणार आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पूर्व विदर्भातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष जवळजवळ हद्दपारचं झालाय. तर अजित पवार यांच्या पक्षाची अवस्था देखील पूर्व विदर्भात फारशी बरी नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पूर्व विदर्भातील ३२ पैकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं तर अजित पवार यांचा पक्ष ३२ पैकी ३ ठिकाणी लढणार आहे.
पूर्व विदर्भाकडं दुर्लक्ष अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना जड जाईल : सत्तेचा मार्ग हा विदर्भातूनच जातो असं कायमच म्हटलं जातं. विदर्भातील एकूण ६२ विधानसभा मतदारसंघात ज्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तो सत्तेत येतो अशी मान्यता आहे. पण या ६२ पैकी पूर्व विदर्भातील ३२ मतदारसंघ तर निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळं भाजपा असो की, काँग्रेस यांचा या ३२ जागांवर कायमचं फोकस असतो. हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी हेरली. त्यांनी पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात आपला उमेदवार दिला. मात्र, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे जमलेलं दिसत नाही.
नागपूर जिल्ह्यात अजित पवारांची पाटी कोरी : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर जास्त फोकस केलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उपराजधानीचा जिल्ह्यात ३ मतदारसंघ मिळावे म्हणून शरद पवार यांनी टोकाचा आग्रह धरला होता. काँग्रेसचा दावा असतानाही नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघातील तीन मतदारसंघ हे शरद पवार यांनी आपल्याकडं घेतले. तर अजीत पवारांना नागपूर जिल्ह्यातील एकही मतदारसंघ मिळू शकला नाही. उपराजधानीच्या जिल्ह्यात अजित दादांची पाटी कोरी आहे असं म्हटलं जातय.
पूर्व विदर्भातील सहापैकी पाच जिल्ह्यातील उद्धव सेना हद्दपार : विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार फक्त चंद्रपूर वगळता पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनाला फक्त नागपूर जिल्ह्यात रामटेकमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाचही जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही.
महाविकास आघाडीचे जागावाटप :
नागपूर जिल्ह्यातील विधानसभा
१) उत्तर नागपूर : काँग्रेस
२) दक्षिण नागपूर : काँग्रेस
३) पश्चिम नागपूर : काँग्रेस
४) दक्षिण पश्चिम नागपूर : काँग्रेस
५) मध्य नागपूर : काँग्रेस
६) पूर्व नागपूर : राष्ट्रवादी - काँग्रेस शरदचंद्र पवार
७) हिंगणा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
८) काटोल : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
९) उमरेड : काँग्रेस
१०) रामटेक : शिवसेना ठाकरे
११) कामठी : काँग्रेस
१२) सावनेर : काँग्रेस
गोंदिया जिल्हा :
१) गोंदिया : काँग्रेस
२) मोरगांव अर्जुनी : काँग्रेस
३) तिरोडा : राष्ट्रवादी शरद पवार
४) देवरी-आमगाव : काँग्रेस
भंडारा जिल्हा :
१) तुमसर-मोहाडी : राष्ट्रवादी शरद पवार
२) भंडारा-पवनी : काँग्रेस
३) साकोली : काँग्रेस
गडचिरोली जिल्हा :
१) गडचिरोली : काँग्रेस
२) अहेरी : राष्ट्रवादी शरद पवार
३) आरमोरी : काँग्रेस
चंद्रपूर जिल्हा :
१) चंद्रपूर : काँग्रेस
२) वरोरा : काँग्रेस
३) चिमुर : काँग्रेस
४) ब्रम्हपुरी : काँग्रेस
५) बल्लारपूर : काँग्रेस
६) राजुरा : काँग्रेस
वर्धा जिल्ह्यातील विधानसभा :
१) वर्धा : काँग्रेस
२) हिंगणघाट : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
३) देवळी : काँग्रेस
४ आर्वी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
हेही वाचा -