ETV Bharat / politics

आर्थिक राजधानीत 25 टक्के पाणी कपात नाही, बीएमसी प्रशासनानं काँग्रेसचे फेटाळले आरोप - Mumbai Water Cut - MUMBAI WATER CUT

Mumbai Water Supply Reduction : मुंबईच्या अनेक भागातील रहिवासी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळं हैराण झाले आहेत. महानगरपालिकेनं 5 टक्के पाणीकपात असल्याचं जाहीर केलं असलं तरी 25 टक्क्यांपर्यंत छुपी कपात सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Water Supply Reduction Congress alleges undeclared 25 percent water cut In Mumbai
देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट, अघोषित 25 टक्के पाणी कपात सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 8:58 PM IST

Updated : Apr 9, 2024, 7:54 AM IST

मुंबई Mumbai Water Supply Reduction : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईकरांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत पाणीकपातीनं मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 27 टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. एकीकडं तलावांची पाणीपातळी कमी झाली असली तरी मुंबईत पाणीकपात होणार नसल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय. तर, दुसरीकडं मात्र मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागतोय.

5 टक्के पाणीकपात : सध्या महानगरपालिकेनं भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या तांत्रिक कामासाठी मुंबईत 24 एप्रिलपर्यंत 5 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. पालिका जेव्हा 5 टक्के पाणीकपात जाहीर करते तेव्हा प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांना 15 ते 20 टक्के अघोषित पाणीकपातीला सामोरं जावं लागतं. ही पाणीटंचाई एप्रिलमध्ये असून आणखी मे महिना बाकी आहे. त्यामुळं जूनपर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीत पाण्याची परिस्थिती काय असेल? हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

मुंबई महानगरपालिका या महानगराला दररोज 3850 दशलक्ष लिटर इतकं पाणी पुरवते. त्यात भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईतील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. हे आशिया खंडातील सर्वात मोठं जलशुद्धीकरण केंद्र आहे. याआधी पालिकेनं मार्च ते जून या कालावधीत मुंबईत 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. पण, पालिकेच्या प्रस्तावाला नाकारत राज्य सरकारनं पालिकेला राखीव कोट्यातून 10 टक्के अतिरिक्त पाणी देण्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर पालिकेनं 1 मार्चपासून मुंबईतील 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव मागे घेतला. आजच्या घडीला राज्य सरकारकडेच 35 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं, राज्य सरकार पालिकेला किती पाणी देणार आणि राज्याच्या इतर भागांना किती पाणी देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसचा आरोप काय? : या संदर्भात बोलताना काँग्रेसचे माजी नगरसेवक आश्रफ आझमी म्हणाले की, "फेब्रुवारी महिन्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिका पाणी कपात करत आहे. मार्चमध्ये राज्य सरकारनं आपण पाणी देणार असल्याचं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात सरकार किती पाणी देतंय, याचा कोणताही रेकॉर्ड नाही. सरकार खरंच पाणी देत आहे की नाही हे पाहायला कोण गेलंय? पालिकेनं आता तांत्रिक कारण देत पाच टक्के पाणी कपात करणार असल्याचं सांगितलं. पण, प्रत्यक्षात मात्र 25 टक्के पाणी कपात केली जात आहे. प्रत्यक्षात किती टक्के पाणी कपात होते याचं मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा आजही महानगरपालिकेकडं नाही," असा आरोप आझमी यांनी केला आहे.

रस्ते धुण्यासाठी धरणांमधील पिण्याच्या पाण्याचा वापर : पुढे ते म्हणाले की, इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई यापूर्वी कधीही मुंबईत भासली नाही. याच वर्षी हे सगळं होण्याचं कारण म्हणजे, मुंबईत जेव्हा प्रदूषणात वाढ झाली त्यावेळी राज्य सरकारनं रस्ते धुवायला सुरुवात केली. रस्ते धुण्यासाठी यांनी जे पाणी वापरलं ते पिण्याचं आहे. आपण फिल्टर केलेलं सांडपाणी वापरत असल्याचं पालिका प्रशासनानं वेळोवेळी सांगितलं. मात्र, या फिल्टर पाण्याचा प्लांट नेमका कुठे आहे? आणि तिथून किती लिटर पाणी रस्ते धुण्यासाठी वापरलं जातंय? याची आकडेवारी पालिका देऊ शकणार आहे का? हे जर समुद्राच पाणी वापरत असतील तर त्यांनी तसं सांगावं. समुद्राचे पाणी वापरत असतील तर रस्त्यांवर पांढरे चट्टे पडणे अपेक्षित होतं. मात्र, तसंही होताना दिसत नाही. याचा अर्थ महानगरपालिका रस्ते धुण्यासाठी धरणांमधील पिण्याचे पाणी वापरत आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या हट्टामुळेच आज मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, या संदर्भात पालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पालिका प्रशासनाकडून यावर बोलण्यास नकार देण्यात आला आहे.

पाणी कपात होणार नाही- यासंदर्भात आम्ही पालिका प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी पालिकेतील मुख्य जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला. यावर मुख्य जल अभियंता माळवदे म्हणाले, "आम्ही याआधी देखील जाहीर केल आहे. मुंबईत कोणत्याही स्वरूपाची पाणी कपात होणार नाही. आम्हाला राज्य सरकारनं अतिरिक्त पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे कोणतीही पाणी कपात मुंबईत होणार नाही. हे आम्ही पुन्हा सांगत आहोत."

हेही वाचा -

  1. "ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि...", बारामतीतील पाणी प्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं - Supriya Sule News
  2. मराठवाड्यातील जलसाठ्यात 25 टक्केच पाणीसाठा, मार्च महिन्यातच पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल - World Water Day 2024
  3. Mumbai Water Supply Reduction: जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामामुळे 24 एप्रिल पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के कपात

Last Updated : Apr 9, 2024, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.