ETV Bharat / politics

दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदानाला प्रतिसाद आधी गरम नंतर नरम... - lok sabha election - LOK SABHA ELECTION

Mumbai South Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा संमिश्र लोकवस्तीचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात जशा झोपड्या आहेत तशाच उच्चभ्रू सोसायटी आहेत. मलबार हिल सारख्या उच्चभ्रू सोसायटीतही मतदानाला चांगला प्रतिसाद आहे तर या मतदारसंघातील दोन उमेदवारांची नावं सारखीच असली तरी त्याने फरक पडणार नाही असं मतदारांचं म्हणणं आहे.

south mumbai
दक्षिण मुंबई (MH desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 6:09 PM IST

Updated : May 20, 2024, 7:14 PM IST

मुंबई Mumbai South Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यातल्या ज्या मोजक्या मतदारसंघांविषयी चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं त्यातला एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा. श्रमजीवी आणि आर्थिकदृष्ट्या उच्चभ्रू वर्गातील मतदारांची सरमिसळ असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि महायुतीच्या वतीने यामिनी जाधव रिंगणात आहेत. थोडक्यात इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना होत आहे. अरविंद सावंत नावाचे दोन उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हातापोटाशी नातं सांगणारे श्रमजीवी आणि ऐहिक सुखांची रेलचेल असलेले उच्चभ्रू याच मतदारसंघात राहतात. जगातल्या सर्वात महाग एफएसआय पैकी एक मलबार हिल इथे आहे आणि कनिष्ठ मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बीडीडी चाळीही. कधीकाळी मराठीजनांचा मानल्या गेलेल्या या परिसरात गुजराती टक्का पाहता पाहता वाढला. इथल्या मराठी, गुजराती मतदारांवर इथल्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. आणखी विशेष बाब, इथे या निवडणुकीत एकाच नावाचे दोन उमेदवार खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत.

झोपडपट्ट्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये 'मतदानाला चला' : सकाळपासून या मतदारसंघातील झोपडपट्ट्या आणि चाळीतील मतदारसंघांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र काही मतदानकेंद्रांमध्ये तांत्रिक समस्यांमुळे एकूण प्रक्रियेला विलंब झाला. दुपारी १२ नंतर उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे आधी जोमात चाललेलं मतदान थंडावलं. उन्हाचा तडाखा थांबल्यानंतर मात्र मतदानाचा घसरलेला टक्का थोडासा सावरला. मुंबईतील अनेक उद्योगपती, वरिष्ठ सनदी अधिकारी आदी या विभागात वास्तव्यास आहेत. वास्तविक अशा सोसायटीतील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत असा समज आहे. परंतु येथील मतदान केंद्रावरही मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा पाहायला मिळल्या. अनेक मतदार हे व्हिलचेअरवर बसून मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्याचं पाहायला मिळालं. मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल येथे सपत्नीक मतदान केलं. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेला पाहायला मिळतो आहे." या मतदारसंघात यामिनी जाधव यांना चांगला प्रतिसाद असून त्या विजयी होतील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे. काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाले आहेत का, असं विचारलं असता त्यांनी गैरप्रकार कुठेही झालेले नाहीत असं सांगितलं. तर उन्हाचा चटका बसत असला तरी मोदींना विजयी करण्याच्या ध्येयाने पछाडलेला मतदार घरात थांबणार नाही, असाही दावा त्यांनी केला.

उमेदवाराच्या नाम साधर्म्याचा फटका कुणाला : या लोकसभा मतदारसंघांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर 14 उमेदवारांची नावं आहेत. यादीत सर्वात पहिलं नाव विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचं असून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आहेत. याच ईव्हीएम मशिनवर आठव्या क्रमांकावर अरविंद गणपत सावंत या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. त्यांचं चिन्ह 'गिरणीची चिमणी' आहे. त्यात अपक्ष उमेदवाराने मतदारांना केलेल्या व्हॉइस अपीलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन केल्यानं संभ्रमात भर पडली. या संदर्भात मतदार राजेंद्र जाधव या मतदारानं बोलकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,"जरी अशा पद्धतीचं नाव सारखंच असलं आणि निशाणी सुद्धा सारखीच भासत असली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. कारण मतदार हे केवळ पहिल्या तीन उमेदवारांवरच लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आठव्या नंबरपर्यंत कोणीही जात नाही आणि गेले तरी त्याचा काही फरक पडणार नाही." तरीही विद्यमान खासदार यांचं निवडणूक चिन्ह 'मशाल' आणि अपक्ष उमेदवार अरविंद गणपत सावंत यांचं निवडणूक चिन्ह 'गिरणीची चिमणी' यांच्यातलं साधर्म्य हा योगायोग आहे का? यावर मतदारसंघात जोरदार चर्चा झडायची थांबली नाही.

हेही वाचा

  1. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, कशी आहे मतदान केंद्रावर परिस्थिती? - Lok Sabha Election 2024
  2. उद्योगपती रतन टाटा, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे मतदान - Lok Sabha election phase 5 voting
  3. दक्षिण मध्य मुंबईत मतदान केंद्रावर घोळ; मतदारांची नावं गायब, आयोगापुढे डोकं आपटायचं का, संतप्त मतदारांचा सवाल - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 20, 2024, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.