ETV Bharat / politics

प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News - JITENDRA AWHAD NEWS

Mumbai High Court Hearing : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे शिर्डीमध्ये वर्ग करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी (18 जुलै) दिलेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले.

cases against Jitendra Awhad for remarks on Prabhu Shri Ram to be investigated by shirdi police says Mumbai High Court
जितेंद्र आव्हाड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 7:49 AM IST

मुंबई Mumbai High Court Hearing : प्रभू श्रीरामाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिर्डी येथील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या प्रकरणी राज्यातील विविध ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळं राज्यातील विविध भागात दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे ठाण्यात एकाच ठिकाणी वर्ग करावेत, अशी मागणी करणारी याचिका आमदार आव्हाड यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गुरुवारी (18 जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे शिर्डीमध्ये वर्ग करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले.

सात ठिकाणी गुन्हे दाखल : "प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते," असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. तसंच हे वक्तव्य आपण पूर्ण अभ्यास करुन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर राज्यात सात ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सातपैकी दोन गुन्हे मुंबईत तर बाकी गुन्हे पुणे, शिर्डी, ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर, यवतमाळ या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. जाणीवपूर्वक धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याविरोधात भादंवि कलम 295 (ए) अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्यात सात ठिकाणी नोंदवलेले सर्व गुन्हे ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्थानकात किंवा नवघर पोलीस स्थानकात वर्ग करण्याची मागणी आव्हाडांतर्फे अ‍ॅड. सागर जोशी आणि अ‍ॅड. विनोद उतेकर यांनी केली होती.

शिर्डी पोलीस करणार तपास : जिथं वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याच ठिकाणी या प्रकरणांची पुढील सुनावणी होईल, असं स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं आता या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आव्हाड यांना शिर्डी न्यायालयात जावं लागेल. तसंच या प्रकरणाचा शिर्डी पोलीस आता तपास करतील. ठाण्यात वास्तव्य असलेल्या आव्हाडांनी ये-जा टाळण्यासाठी आपल्या घराजवळील वर्तकनगर आणि नवघर पोलीस ठाण्याचा पर्याय दिला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव नाकारण्यात आला.

हेही वाचा -

  1. 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024
  2. फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
  3. नागरी नक्षली विधेयक महाराष्ट्रासाठी घातक, हे विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही; जितेंद्र आव्हाड - urben nakshali bill

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.