ETV Bharat / politics

भाजपाच्या दोन खासदारांमधील वैर शमलं? सतरा वर्षानंतर घेतला दोघांनी एकत्र 'चहा' - खासदार अशोक चव्हाण

Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाचं कमळ हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अयोजित केली होती. याला खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) हे देखील उपस्थित होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 8:55 AM IST

अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर एकत्र

नांदेड Ashok Chavan : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र तर कायमचा शत्रू नसतो, असाच अनुभव सध्या नांदेडकर अनुभवताना दिसत आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्यात सध्या मिनोमिलन झाल्याचं दिसतंय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतलंय. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलीय. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे सध्या एकत्रित बैठका घेऊन नांदेड जिल्ह्यात कमळ कसं फुलेल यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

नांदेडमध्ये भाजपाचे दोन खासदार एकत्र : शनिवारी अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सर्वांमध्ये समन्वय रहावा आणि येणाऱ्या लोकसभेत नांदेडमधून भाजपाचा उमेदवार कसा निवडून येईल यावर आम्ही सर्वजण मिळून काम करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलीय.

भाजपाच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींना चहापानाचं निमंत्रण : अशोक चव्हाण खासदार झाल्यानंतर नांदेडमध्ये आल्यावर त्यांचं मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी चव्हाण यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. "मला पक्षानं मोठी जबाबदारी दिली," असं म्हणत त्यांनी आपल्या नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली. तसंच आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदार, खासदारांची बेठक बोलावली होती. या बेठकीला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती राहणार की नाहीं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, खासदार चिखलीकर यांनी बेठकीला हजेरी लावून मनोमिलनाचे संकेत दिले.

समन्वय राहावा म्हणून निमंत्रण : या बैठकीनंतर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, "मी आणि अजित गोपछडे आम्हा दोघांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आणि मी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपामधील आजी-माजी खासदार, आमदार यांना चहाचं निमंत्रण दिलं होतं. आमच्यात समन्वय राहावा आणि आता आमच्यात कोणताही वाद-विवाद नाही. जी आधी होती ती पक्षीय भूमिका होती. येणारी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनात चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचं 28 तारखेला आगमन होणार आहे त्यावरही चर्चा झाली."

  1. आता आमचा वाद संपला : खासदार चिखलीकर म्हणाले की, "अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यानं आमचा वाद संपला. मी अनेकवेळा सांगितलं की चव्हाण भाजपामध्ये येणार आहेत. आता ते आले आणि आमचा राजकीय वाद संपलाय. आता पक्षानं कोणालाही उमेदवारी दिली तरी त्यांना 100 टक्के निवडून आणायचं काम आम्ही करणार आहोत."

हेही वाचा :

  1. अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांसह काय म्हणाले काँग्रेसचे आमदार?
  2. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोकराव चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, एक ते दोन दिवसात ठरविणार राजकीय दिशा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.