रत्नागिरी MLA Vaibhav Naik : शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते तथा बाधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभव नाईक यांच्या भेटी संदर्भात खुलासा केलाय. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीसाठी आलो असताना वैभव नाईक यांची कणकवली रेस्ट हाऊसला भेट झाली. सिंधुदुर्गातल्या विकास कामांसंदर्भात वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण : भेटीबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हणाले की, "कोकणात संघटना वाढीच्या दृष्टीनं मी प्रयत्न करत असतो. अनेक लोकप्रतिनिधी माझ्या संपर्कात असतात. वैभव नाईकांनी देखील माझ्याशी बऱ्याच वेळा चर्चा केलीय. पण नेहमीच मी त्यांना सांगितलंय, की कोकण या विषयात नारायण राणेंना विचारल्याशिवाय आम्ही कुठलाच निर्णय घेणार नाही." रवींद्र चव्हाण यांनी हो वक्तव्य केल्यानं आमदार वैभव नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
राणेंना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही : "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारल्याशिवाय किंबहुना त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट आम्ही करत नाही. कुणाला पक्षात घ्यायचं असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विश्वासात घेऊनच पुढची पावलं टाकली जातात. त्याशिवाय इतर चर्चाही झाल्या. बंद दाराआड काय झालं, हे जर सांगितलं तर उचित ठरणार नाही," असं सूचक विधान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण : गेल्या काही दिवसांत राणे आणि नाईक यांनी एकमेकांवर टीका करण्याचं टाळल्याचं दिसून येतंय. भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग इथं राणेंवर टीका केल्यावर लगेच निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. या पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला निलेश राणे यांनीही थेट टीकात्मक उत्तर देणं टाळलं होतं. यातच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभव नाईकांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा :