ETV Bharat / politics

"आम्हीच 'दलाल नंबर टू' चित्रपट काढून तुमचे काळे धंदे समोर आणू", संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल - Sanjay Shirsat on Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 5:16 PM IST

Sanjay Shirsat on Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची लगबग पाहायला मिळत आहे. कोणी टीका करत आहे, तर काही जुनी प्रकरणं बाहेर काढून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलेल्या टिकेवर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Shirsat on Sanjay Raut
संजय शिरसाट, संजय राऊत (Source - ETV Bharat)

मुंबई Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत शिंदे गटावर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक शिगेला पोहोचणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य आगीत तेल ओतणारं ठरलं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना "शिंदे यांनी काय काय प्रकार केलेत, कोण कोणते घोटाळे केलेत, याची माहिती आपण लवकरच बाहेर काढणार आहोत. मुख्यमंत्री चित्रपट निर्माते झाले आहेत. परंतु त्यांच्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि पटकथालेखक मीच असणार आहे. आता 'नमक हराम टू' हा चित्रपट आम्ही लवकरच काढू," असं जाहीर करुन टाकलं.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

काळे धंदे बाहेर येतील : संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले की, "संजय राऊत हे दररोज उठून केवळ आरोप करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. त्यांच्याकडे जर खरोखरच एखाद्या घोटाळ्याची कागदपत्रं किंवा पुरावे असतील, तर त्यांनी ते पोलिसांकडे किंवा संबंधित यंत्रणांना द्यावेत किंवा न्यायालयात जाऊन दाद मागावी. माध्यमांसमोर या गोष्टी बोलून काहीही फरक पडत नाही. यांच्याकडे कसलेच पुरावे नाहीत. त्यांच्या बोलण्यात कसलंंच तथ्य नाही, म्हणून ते केवळ तोंडाच्या वाफा घालवत असतात. संजय राऊत नेहमीच फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात. खरंतर संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांवर आता आम्हीच 'दलाल नंबर 2' हा चित्रपट काढणार आहोत. ज्यातून यांचे सर्व काळे धंदे बाहेर येतील."

तेव्हा शिंदे केवळ ठाण्याचे नेते : "शिवसेनेचे तत्कालीन नेते राज ठाकरे यांना पक्षांमध्ये डावलून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा होती म्हणूनच राज ठाकरे यांना पक्षात डावललं गेलं आणि त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "त्यावेळी नेमकं काय घडलं हे शिंदे यांना ठाऊक नाही. शिंदे तेव्हा केवळ ठाण्यापुरते मर्यादित असलेले नेते होते. राज ठाकरे यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत," मात्र संजय राऊतांच्या या वक्तव्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहमत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या विधानात सत्यता - मनसे : "मुख्यमंत्री जे काही बोलले ते खरं आहे. राज ठाकरे यांना बाजूला सारून उद्धव ठाकरे यांना एककल्ली कार्यक्रम राबवायचा होता. 'आयत्या बिळावर नागोबा' असा हा प्रकार होता." असा आरोप राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला. "राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडायचं नव्हतं. त्यांनी वेगवेगळे पर्याय समोर ठेवले होते. विदर्भ, कोकण असे जे वेगवेगळे पट्टे आहेत त्यापैकी एक मला द्या, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. मात्र राज ठाकरे शिवसेनेत नकोच, अशीच उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. त्यामुळं राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर देखील त्यांनी लगेच पक्ष स्थापन केला नव्हता. आपल्या सोबत जे लोक बाहेर पडले त्यांचं भविष्य काय? त्यांचं भवितव्य काय? याचा विचार करून सहा महिन्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात सत्यता आहे," अशी ग्वाही यशवंत किल्लेदार यांनी दिली.

हेही वाचा

  1. महायुतीत ठिणगी : शिवसेनेच्या 'वाघाचा' भाजपाच्या मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले शंभर टक्के युती तोडण्याचा प्रयत्न होतोय - Ramdas Kadam On Ravindra Chavan
  2. महाराष्ट्रात येणार नमक हराम 2 चित्रपट; 'चित्रपटाची कथा, पटकथा मी देणार,' संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Sanjay Raut On Eknath Shinde
  3. संभाजी भिडे यांच्या प्रश्नावर भडकले शरद पवार : म्हणाले 'मी त्यांच्यावर बोलावं इतकी त्यांची लायकी नाही' - Sharad Pawar On Sambhaji Bhide
  4. ताई नाशकात दादा मुंबईत ; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेले 'हे' बहीण भाऊ आज राखी बांधणार का ? - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.