ETV Bharat / politics

"लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : रवी राणामुळंच नवनीत राणा या (Navneet Rana) अमरावती लोकसभेला पडणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला. ते आज अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.

MLA Bacchu Kadu On Navneet Rana
आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा (ETV Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 10:45 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू (ETV Bharat Reporter)

अमरावती Lok Sabha Election 2024 : लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती की, नवनीत राणा पडणार. रवी राणामुळंच नवनीत राणा (Navneet Rana) पडणार असल्याचं भाकीत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी अमरावतीच्या सट्टा बाजारावर कडूंचं लक्ष वेधलं असता आमदार कडू म्हणाले की, सट्टा बाजारात भाव कोणाचेही काही असू द्या पण बाजी आम्हीच मारू. आम्हीच निवडून येऊ असा पुनर्विचार प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी केलाय.

आम्ही निवडणूक जिंकलो आहोत : पुढे बोलताना आमदार कडू की, आजच आम्ही निवडणूक जिंकलो आहोत, कारण इतर कोणत्याही पक्षाच्या प्रचारामध्ये शेतकरी, शेतमजूर नव्हते. हे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो. आम्ही ते मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यात सफल राहिलो. जात धर्माच्या पलीकडं जाऊन निवडणूक लढवता आली पाहिजे, त्यामुळंच आमच्या प्रचारामध्ये सर्वसामान्य जनतेचे मुद्दे होते. तांत्रिकदृष्ट्या काय निकाल लागेल ते माहित नाही, परंतु आम्ही मात्र जिंकली आहे.

४ जूनला दिसणार आमची ताकद : निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला हे आमचं या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं स्लोगन होतं. कष्टकरी जनतेचे प्रश्न घेऊनच ही निवडणूक आपण लढलो असल्याचं आमदार कडू यांनी सांगितलंय. प्रहार जनशक्ती पक्षाची अमरावती जिल्ह्यात काय ताकद आहे हे आम्हाला दाखवून द्यायची होती. आम्ही कशाप्रकारे निवडणुकीत बाजी मारू शकतो, हे आज जरी मतपेटीत बंद असलं तरी येत्या 4 जूनला आमची ताकद विरोधकांना दिसल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा -

  1. "आता आमचं लक्ष्य विधानसभा, 27 तारखेला राष्ट्रवादी पक्षात..."; सुनील तटकरेंचा मोठा दावा - Lok Sabha Election 2024
  2. समाज माध्यमांवर व्हायरल होणारे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रातील नाहीत; राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण - Lok Sabha Election 2024
  3. सिद्धार्थ मल्होत्रा ​​मतदान करण्यासाठी दिल्लीत दाखल, ईशा गुप्तानं केलं मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.