ETV Bharat / politics

शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवार गटाच्या आमदारावर घोटाळ्याचा गंभीर आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? - Navi Mumbai Market Committee - NAVI MUMBAI MARKET COMMITTEE

Navi Mumbai Market Committee Scam : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 15) शक्तीप्रदर्शनाने ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, आदल्याच दिवशी कोरेगावचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी शशिकांत शिंदेंवर (Shashikant Shinde) 4 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिलीय.

Mahesh Shinde on Shashikant Shinde
महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 8:36 PM IST

Updated : Apr 14, 2024, 10:40 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार महेश शिंदे

सातारा Navi Mumbai Market Committee Scam: नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि तत्कालिन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केला.

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार : आमदार महेश शिंदे म्हणाले की, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा गैरव्यवहार 137 कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, प्रत्यक्षात तो गैरव्यवहार 4 हजार कोटींचा आहे. या संदर्भात तत्कालीन संचालकांनी उच्च न्यायालयातून ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार देऊन पण संचालकांना संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

९ कोटीचा गाळा ५ लाखात विकला : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी 72 हेक्टरचा भूखंड वितरित करण्यात आला होता. त्यापैकी काही जागेत 466 गाळे विनापरवानगी बांधण्यात आले. एक गाळा एक हजार स्क्वेअर फूट असून रेडिरेकनरप्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना हे गाळे पाच लाख रुपये किमतीने तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले. एकाच कुटुंबामध्ये 130 गाळ्यांची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आमच्याकडं असल्याचं आमदार महेश शिंदे म्हणाले.

शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून मी उद्या अर्ज भरणार आहे. मला लोकाचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. मी सगळे पुरावे द्यायला तयार असून दोषी आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही. - शशिकांत शिंदे,आमदार

पृथ्वीराज चव्हाणांनी दिले होते चौकशीचे आदेश : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यांनी पणन संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर, संचालक शशिकांत शिंदे, प्रदीप खोपडे, संजय पानसरे, बापू भुजबळ यांच्यासह अन्य संचालकांनी हा गैरव्यहार केल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक समिती स्थापन करून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, अशी माहितीही आमदार शिंदे यांनी दिली.

शेतीमाल विक्रीच्या जागेवर बांधले गाळे : हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचा अहवाल सौनिक समितीने दिला होता. मात्र, या अहवालावरसुद्धा तत्कालीन पणन संचालकांनी स्थगिती घेतली. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची जागा उपलब्ध होती, त्या ठिकाणी चटई क्षेत्रात गाळे बांधून त्यामध्ये चार हजार कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आमदार महेश शिंदे यांचा आरोप आहे. उच्च न्यायालयानं 19 मार्च 2024 रोजी पणन संचालकांना दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी, हे गाळे ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आमदार शिंदे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News
  2. "बारामती लोकसभेची निवडणूक विचाराची लढाई, नात्याची नाही"; सासऱ्यांच्या टीकेवर सुनेचं उत्तर - Sunetra pawar
  3. "अमोल कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडावं लागतं, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ..", शिवाजीराव आढळरावांचा आरोप - Shirur Lok Sabha Constituency

Last Updated : Apr 14, 2024, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.