ETV Bharat / politics

विदर्भात महायुतीचं अपयश कशामुळं? काय असतील कारणं? वाचा... - LOKSABHA ELECTIONs 2024 - LOKSABHA ELECTIONS 2024

BJP failure in Vidarbha : लोकसभा निवडणुकीत भाजपाला विदर्भातून दहा जागांपैकी दोन जागांवर भाजपाला यश मिळवता आलंय, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे पाच जागा मिळाल्यात. विदर्भात महायुतीचा इतका दारुण पराभव कशामुळं? काय असतील कारणं? वाचा...

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 2:19 PM IST

Updated : Jun 7, 2024, 2:30 PM IST

नागपूर Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024चे सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजपाची पुरती वाताहत झाल्याचं चित्र हे स्पष्ट झालंय. एवढंच नाही तर भाजपाचे इतर भिडू ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही लोकांनी सपशेलपणे नाकारलंय. त्यामुळं महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलीय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपाला विदर्भातून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र विदर्भातील जनतेकडून यावेळी भाजपा आणि सहकारी पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामागील कारण म्हणजे भाजपा नेहमीच विदर्भाला गृहीत धरण्याची चूक करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र 2024 च्या लोकसभा नंतर नव्या जोमानं पक्षबंधणी केली त्यामुळेचं आज विदर्भ हा काँग्रेसच्या बाजूनं भक्कमपणे उभा राहिलाय. विदर्भातील दहा लोकसभा जागांपैकी नागपूर, अकोला व बुलढाणा वगळता इतर कोणत्याही जागेवर भाजपासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टिकाव लागला आला नाही. दुसरीकडे काँग्रेसनं मात्र, आपला बालेकिल्ला परत मिळवलाय.

भाजपची विदर्भात मोठी घोडचूक : 2009 व 2014च्या निवडणुकीत विदर्भात भाजपला अपेक्षित यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर विदर्भ कायम भाजपाच्या पाठीशी उभा राहील, असा गोड गैरसमज भाजप नेत्यांना झाला. 2019च्या विधानसभा निवडणूकीत तर विदर्भानं काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलेला होता. त्यावेळी भाजपा नेत्यांनी विदर्भात पक्षाचं काय चुकलं, याचं विश्लेषण देखील केलं होत. मात्र, यावेळी देखील भाजपा नेत्यांनी विदर्भाला गृहीत धरण्याची मोठी घोडचूक केली. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातुन समोर आलाय.

रामटेकचा गड महायुतीनं गमावला : 2014 आणि 2019 मध्ये रामटेकच्या गडावर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला होता. पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी तर आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हाती घेतलं. पण त्यांना यावेळी रामटेकचा गड सर करता आला नाही.

सुनील केदार 'किंगमेकर' : नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळं माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सुनील केदार यांनी रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी ही जागा काँग्रेसनं सोडली अशी चर्चा होती, परंतु सुनील केदार यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावून श्यामकुमार बर्वेना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणलं, त्यामुळंचं सुनील केदार हे नागपूर ग्रामीण भागाच्या राजकारणातले केवळ किंगच नाही तर 'किंगमेकर' सुद्धा आहेत, अशी चर्चा सुरू झालीय.

रामदास तडस यांना का नाकारलं? : 2014 आणि 2019 मध्ये रामदास तडस मोदी लाटेवर स्वार होऊन प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले होते. या दहा वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात सांगता येईल असं कोणतंही काम केलं नाही. याशिवाय रामदास तडस ज्या तेली समाजाचं प्रतिनिधित्व करतात तो समाज सुद्धा प्रचंड नाराज होता. तरी देखील तेली समाजाच्या नाराजीकडे रामदास तडस यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तेली समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असं त्यांनी गृहीत धरलं होतं. त्याचाच फटका तडस यांना निवडणुकीच्या निकालात बसलाय.

नवनीत राणांविरोधात अमरावतीत असंतोष : 2019मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरोशावर लोकसभेची निवडणूक जिंकल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करताच नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावतीमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी कारण नसताना छेडलेल्या आंदोलनामुळं तर उद्धव यांचे स्थानिक शिवसैनिक त्यांच्या विरोधात पेटून उठले होते. देशभराचं लक्ष वेधणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा तब्बल 19 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. बच्चू कडू यांच्या 'प्रहार' पक्षानं दिलेल्या उमेदवाराचा फटका हा नवनीत राणा यांना बसला आहे. प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी 85 हजार पेक्षा जास्त मतांचा टप्प्या गाठल्यामुळेचं नवनीत राणांचा दारुण पराभव झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारवर नाराज : 2019च्या लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री हंसराज अहीर यांचं तिकीट कापून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलं. मात्र, जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विरोधात मोठी लाट होती. जिल्ह्यातील शेतकरी हा कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अवलंबून असल्यानं हमी भावाचा मुद्दा ग्रामीण भागात पेटला होता. शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी हमीभाव यामुळं शेतकऱ्यांच्या मनात केंद्र सरकार विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. मोदींच्या एकहाती सत्ता केंद्राचाही इथे मुद्दा होता, त्यामुळं आता दिल्लीत बदल हवा अशी मतदारांची इच्छा होती. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं 2015ला जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. यामुळं जिल्ह्यातील अर्थचक्र थांबले. दारूचा मोठा काळाबाजार सुरू झाला. त्यामुळं सुधीर मुनगंटीवार यांच्यावर याबाबत टीका होऊ लागली. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेली विकासकामं देखील वादग्रस्त ठरली. जिल्ह्याचा मुलभूत विकास सोडून बगीचे आणि इमारतीमध्ये निधी खर्च केला आणि त्याच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. पालकमंत्री असताना त्यांनी फक्त आपल्याच मतदारसंघात लक्ष दिला अशीही टीका होत होती. एकूणच उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी होती. शिवाय मुनगंटीवार यांनी प्रचारकाळात केलेली वादग्रस्त विधानंसुद्धा त्यांना भोवली.

यवतमाळमध्ये उमेदवार देताना केली मोठी चूक : गेली 25 वर्ष यवतमाळ-वाशीम हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. भावना गवळी यांनी या मतदारसंघाचं अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं. मात्र, यावेळी भावना गवळी यांच्या विरोधात लाट असल्याचं कारण देत उमेदवार बदलण्यात आला आणि नेमकी हीच चूक एकनाथ शिंदेंना भारी पडली. भावना गवळी यांची नाराजी ओढवून राजश्री पाटील यांना लोकसभा रिंगणा उतरवलं पण स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद निर्माण झाल्यामुळं याचा फटका महायुतीला बसला. राजश्री पाटील मूळच्या हिंगोली येथील असून त्यांचं माहेर हे यवतमाळ जिल्हा आहे. त्यांनी यवतमाळ मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. यवतमाळच्या जनतेनं त्यांना सपशेल नकार दिला. भावना गवळी या प्रचारात फार सक्रिय दिसून आल्या नाहीत.

गडचिरोलीत भाजपा नेते झाले फेल, 'विजय'च्या मदतीने खेचून आणला 'विजय' : गडचिरोली जिल्ह्यत भाजपासाठी सर्व परिस्थिती अनुकूल होती तरी देखील नेते यावेळी पक्षाची नय्या पार लावू शकले नाहीत. राजकारणात फारसा अनुभव नसलेल्या एका नवख्या उमेदवारानं अशोक नेते यांना पराभूत केले आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नियोजना पुढं भाजप नेते हतबल ठरले. विजय वडेट्टीवर हे अनेक दिवस गडचिरोलीत तळ ठोकून बसले. त्याचाच फायदा निकालात दिसून आला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी गडचिरोलीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याचा फटका भाजपला बसलाय. शिवाय अशोक नेते यांच्यावर भाजपानं दाखवलेला अति आत्मविश्वास नडला आहे. अशोक नेते यांना काँग्रेसचे नवखे उमेदवार नामदेव किरसान यांनी आस्मान दाखवलं.

भंडारा-गोंदिया भाजपाच्या हातून निसटला : भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपा विरुद्ध काँग्रेस यांच्यात अगदी अंतिम क्षणापर्यंत लढत बघायला मिळाली. भाजपाचे उमेदवार संजय मेंढे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली, मात्र त्यांचा सुद्धा पराभव झालाय. तब्बल 25 वर्षांनंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय. काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी प्रचार ज्या जोमानं केला ते बघता काँग्रेस यावेळी विजयी होईल असं वाटतं होत, परंतु भाजपा मात्र विजयाची खात्री बाळगून होते. हा आत्मविश्वास त्यांना नडला आहे.

अकोल्यात तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा : अकोला लोकसभा मतदारसंघात अखेरपर्यंत चुरशीची लढत झाली. काँग्रेसचे अभय पाटील विजयी होतील असं सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये दिसत होत, मात्र भाजपाचे अनुप धोत्रे यांनी अखेरच्या क्षणी मुसंडी मारली. वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे जवळपास दोन लाखाच्या मतांनी मागे राहिले. काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हेच बाजी मारतील असं वाटत असताना अकोल्याच्या मतदारांनी माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना खासदार म्हणून निवडलं.

बुलढाण्यात प्रताप जाधव यांची जादू कायम : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची जादू कायम राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत जवळपास तीन लाख मतांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांनी बाजी मारली आहे. बुलढाणा मतदारसंघात 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' असा अटीतटीचा सामना रंगला होता.

हेही वाचा

Last Updated : Jun 7, 2024, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.