ETV Bharat / politics

विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 10:46 PM IST

Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर आता विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सत्ताधारी, विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे मत जाणून घ्या.

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (File Photo)

मुंबई Maharashtra Politics : बुधवारी शिवसेना (ठाकरे गटाच्या) शाखाप्रमुख मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला. "एक तर राजकारणात मी राहिन किंवा तू राहशील..." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं होतं. त्याआधी बुधवारी सकाळी संजय राऊतांनी "महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस जात नाहीत तोपर्यंत मराठी माणूस सुखी आणि शांत होणार नाही" असं म्हटलं होतं. या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत.

प्रतिक्रिया देताना प्रवक्त्या मनिषा कांयदे (ETV Bharat Reporter)

घाणेरडं राजकारण : "आपण गृहमंत्री असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविषयी प्रतिज्ञापत्र बनवून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टाकला होता, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केल्यानंतर यावर सत्ताधारी-विरोधकाकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना शिवसेना (ठाकरे गटाचे) माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केला. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांचा छळ केला. त्यांना कसा त्रास द्यायचा हे कपट आणि कारस्थान रचलं. कुटुंबांच्या मुलांबाळापर्यंत पोहोचले. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाले नाही. अत्यंत खालच्या पातळीचे आणि घाणेरडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालं. त्यामुळं याला स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्युत्तर मिळालं. म्हणून उद्धव ठाकरेंनी "राजकारणामध्ये एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहिन" असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही. परंतु त्यांनी केलेलं घाणेरडं राजकारण आणि शिवसेनासारखा पक्ष संपवला ते अत्यंत वाईट आहे."

म्हणून फडणवीसांना लक्ष केलं जातंय : राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाले, " "देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" असं विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणत होते. परंतु राज्यात शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आणि सत्तांतर झालं. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर आपण दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असं उघडपणे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. अनिल देशमुख यांच्याकडून ते विरोधकांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. हे त्यांनी केलेलं राजकारण अत्यंत चुकीचं आणि वाईट होतं. मग उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा महाविकास आघाडीतील पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणं स्वाभाविक आहे. कारण देवेंद्र फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहेत. त्यामुळंच आपणच जर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं किंवा डॅमेज केलं तर ते अधिक उत्तम होईल, अशी विरोधकांची रणनीती आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरले. ही रणनीती विरोधकांनी आणि खास करून उद्धव ठाकरेंनी आखली असल्याचं दिसतेय. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी "राजकारणात एक तर मी राहीन किंवा फडणवीस राहतील" अशी गर्जना केली आहे."

फडणवीस सुसंस्कृत नेते : शिवसेना (शिंदे गटाच्या) प्रवक्ता, मनिषा कायंदे यांनी म्हटलं, " राज्याच्या कसा विकास होईल आणि सर्व घटकापर्यंत सरकार कसा पोहोचेल हा सरकारचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंनी जी भाषा वापरली, ती राजकारणात कोणीही भाषा वापरत नाही. एखाद्याला आव्हान देणं यात कसला मोठेपणा आलाय. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत नेते आहेत. ते असे खालच्या स्तराला जाऊन कोणावरही टीका करत नाहीत किंवा बोलत नाहीत. परंतु उद्धव ठाकरेंनी राहण्या-जाण्याचे आव्हान दिलं आहे. ते आम्हाला फारसे महत्त्वाचे वाटत नाही. त्यापेक्षा राज्यातील लोकांचे प्रश्न सरकारला महत्त्वाचे वाटत आहेत."

हेही वाचा -

  1. भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार : ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका - BJP criticizes Uddhav Thackeray
  2. 'राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा - Uddhav Thackeray targeted Fadnavis
  3. राज्यात एकही आमदार नसलेल्या रामदास आठवलेंचा अजब दावा; म्हणाले, ...तर मीच मुख्यमंत्री होणार - Ramdas Athawale

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.