ETV Bharat / politics

अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस वादात आता समित कदमांची एन्ट्री, नेमकं काय आहे प्रकरण? - Amit Deshmukh Vs Samit Kadam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 1:41 PM IST

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : जनसुराज्य पक्षाचे युवा अध्यक्ष समित कदम यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर आरोप करण्यास सांगितलं होतं, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. याप्रकरणी समित कदम आणि अनिल देशमुख यांच्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता स्वत: समित कदम यांनी माध्यमांसमोर येत मोठा खुलासा केलाय.

Samit Kadam clarification over Anil Deshmukh allegation on Devendra Fadnavis ED Case
देवेंद्र फडणवीस, समित कदम, अनिल देशमुख (Samit Kadam Photo Social Media)

मुंबई Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख असा राजकीय सामना रंगत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी फडणवीस यांनी माझ्याकडं एका व्यक्तीला पाठवून दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला. मात्र, मी असा कोणताही दबाव आणला नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, ज्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी फडणवीसांकडून पाठवण्यात आल्याचा दावा देशमुखांकडून केला जातोय, त्याच समित कदम यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? : चार दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधत असताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करा. मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता. तसंच फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचं नाव समित कदम असल्याचं सांगितलं. तो आपल्याकडं यासंदर्भात पाच ते सहा वेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला. इतकंच नाही तर समित सोबतच्या संवादाची व्हिडिओ क्लिपसुद्धा आपल्याकडं असल्याचा दावाही देशमुखांनी केला. देशमुखांच्या या आरोपांना उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडंदेखील अनिल देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता या प्रकरणात समित कदमांची एन्ट्री झाल्यामुळं या प्रकरणानं आता नवीन वळण घेतलंय.

समित कदमांची प्रतिक्रिया : याप्रकरणी स्पष्टीकरण देत समित कदम म्हणाले की, "तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. मग मी त्यांच्या परवानगीशिवाय तिथं कसं काय जाऊ शकतो? मला त्यांनीच बोलवलं होतं. त्यामुळे मी गेलो होतो. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माझी अडचण सांगून काही मदत होते का? याबाबत त्यांच्याशी बोला," असं मला अनिल देशमुखांनी सांगितल्याचं समित कदम म्हणाले. तसंच देशमुखांनी जे फडणवीसांवर चुकीचे आरोप केले," असा कदम यांनी दावा केला.

मग वाय प्लस सुरक्षा कशी? : या प्रकरणावर प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाला अनिल देशमुख बळी पडले नाहीत. जे घाबरले ते भाजपात गेले आहेत. फडणवीस म्हणत आहेत, त्याचा आमचा समित कदमांशी संबध नाही. मग देवेंद्र फडणवीस आणि समित कदमांचा एकत्र फोटो कसा? तसंच हा व्यक्ती कोण? याचं सामाजिक आणि राजकीय योगदान काय आहे? मग या व्यक्तीला वाय प्लस दर्जाची सुरक्षा कशी? कोणी दिली?", असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule
  2. सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…; श्याम मानव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी - पाहा व्हिडिओ - Shyam Manav On Devendra Fadnavis
  3. 'ठाकरे कुटुंबीयांना अडकवण्याचा डाव' ; श्याम मानव यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप - Shyam Manav On Ajit Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.