ETV Bharat / politics

मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics

CM DCM Meeting at Varsha Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्षावर सोमवारी रात्री उशिरा तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar late night meeting at Varsha Bungalow
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 12:25 PM IST

मुंबई CM DCM Meeting at Varsha Bungalow : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या 15 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका असल्यानं सध्या राज्यात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं बघायला मिळतंय. अशातच सोमवारी (17 जून) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाली. त्याचा महायुतीला फटका बसला. महायुतीच्या या पराभवाला कारणीभूत राष्ट्रवादी अजित पवार गट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, अजित पवार गटानंदेखील सर्व आरोप फेटाळत थेट विधानसभेत 80 ते 90 जागांची मागणी केली. तसंच शिवसेना शिंदे गटानंदेखील विधानसभा निवडणुकीसाठी 80 ते 90 जागांची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत दावे प्रति-दावे सुरू आहेत.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक- भाजपानंदेखील मोठ्या हालचालींना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक झाली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठी खलबत सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

जागा वाटपासंदर्भात एक यादी तयार- वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात एक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली येथील बैठकीत अमित शाह यांच्यासमोर ठेवणार असल्याचं सांगितलं जातंय. पावसाळी अधिवेशनापूर्वीच महायुती मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवरदेखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर या बैठकांचं फलित नेमकं काय निघतं? याबाबत औत्सुक्य आहे.

हेही वाचा -

  1. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Maharashtra Breaking News Live
  2. मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा, लोकसभेतील खराब कामगिरीनंतर काय होणार बदल? - Yogi Adityanath meet Mohan Bhagwat
  3. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठकीत काय होणार चर्चा? - NCP Meetings Inside story

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.