ETV Bharat / politics

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घटक पक्षांची नाराजी दूर होणार का? महायुतीनं कसली कंबर - assembly elections 2024 - ASSEMBLY ELECTIONS 2024

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही घटक पक्ष महायुतीमधून बाहेर पडता कामा नये, याकरता भारतीय जनता पक्षाकडून कसोशीचे प्रयत्न केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घटकपक्षांचं काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊ.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रणनीती
Maharashtra Assembly election (Source- ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 8:17 AM IST

Updated : Sep 3, 2024, 8:35 AM IST

मुंबई- महायुतीतील बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, महादेव जानकर यांचा रासप आणि ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम या घटक पक्षांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घटक पक्षांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद- विधानसभा निवडणुकीला जेमतेम दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उरलेला असताना महाविकास आघाडी अथवा महायुती या दोन्ही पक्षांतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यातच जागावाटपाचा तिढा सोडवताना महायुतीला घटक पक्षांनाही योग्य न्याय द्यावा लागणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर सामील झाल्यानं जागा वाटपात हिस्सेचे तीन वाटेकरी झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये कशा पद्धतीने रस्सीखेच होते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेलाच आहे. त्यातच महायुतीमधील प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, रासपचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची नाराजी समोर आली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद होण्याची शक्यता- घटक पक्षांच्या नाराजीनं महायुतीचे विशेष करून भाजपचे नेते धास्तावले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये १३ घटक पक्षांना जागा दिल्या जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. तसेच जो पक्ष जागा जिंकेल ती जागा त्या पक्षाला देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. बावनकुळे यांनी घटक पक्षांना खुश करण्यासाठी अशी घोषणा जरी केली असली तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुन्हा महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. एक नवीन फॉर्म्युला तयार होऊन जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat Reporter)

महायुती बऱ्यापैकी बॅक फुटवर- लोकसभेत बसलेला फटका भरून काढण्यासाठी महायुतीनं 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (MMLBY) जाहीर करत विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. परंतु बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार त्या पाठोपाठ राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा या कारणाने महायुती बऱ्यापैकी बॅक फुटवर गेली. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यांमध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला असून त्यांची चाचपणी सुरू आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये याबाबत २८ ऑगस्ट रोजी बैठकसुद्धा पार पडली. या बैठकीत प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू उपस्थित होते. यासोबतच महादेव जानकर यांच्या रासप, ज्योती मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षानं स्वतंत्र भूमिका घेतली असल्याकारणानं त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. या कारणाने भाजपानं आता सावध पवित्रा घेतला आहे. भाजपानं घटक पक्षांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीसोबत असलेले १३ घटक पक्ष

  1. हितेंद्र ठाकूर - बहुजन विकास आघाडी
  2. बच्चू कडू - प्रहार जनशक्ती
  3. विनायक कोरे - जेएसएस
  4. रामदास आठवले - रिपाइं
  5. जोगेंद्र कवाडे - पीआरपी
  6. रवी राणा - स्वाभिमान
  7. सदाभाऊ खोत - रयत क्रांती संघटना
  8. ज्योती मेटे - शिवसंग्राम
  9. नाथाभाऊ शेवाळे - जनता दल सेक्युलर
  10. सचिन खरात - रिपाइं खरात गट
  11. सुलेखा कुंभारे -बहुजन रिपब्लिकन एकता मंच
  12. अनिल कांबळे - भीमसेना
  13. विष्णू कसबे - लहुजी शक्ती सेना

खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांची आहे. त्याकरता हे दोन पक्ष सोडले तर इतर घटक पक्षांना जास्त महत्त्व असल्याचं काही कारण नाही-राजकीय विश्लेषक-जयंत माईणकर

मतांची फाटाफूट टाळण्याचं आव्हान- घटक पक्षांच्या मुद्द्यावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सोबत असलेल्या घटक पक्षांची ताकद दिसून आली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये फटका बसला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचा हवा तसा इम्पॅक्ट दिसून आला नाही. इतर छोटे घटक पक्ष नाममात्र राहिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हेच खरे महत्त्वाचे घटक पक्ष म्हणून राहिले आहेत." मतांची फाटाफूट करण्यासाठी महायुतीकडून गरजेनुसार योग्य त्या घटक पक्षाला योग्य त्या ठिकाणी उतरविण्यात येणार आहे. घटक पक्षाचा पूर्ण फायदा करून घेण्याच्या तयारीत महायुती आहे," असे मत राजकीय विश्लेषक माईणकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा-

  1. विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपाच्या दाव्यानं शिवसेना, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Assembly Elections 2024
  2. विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचाच वरचष्मा? मुख्यमंत्रीपदावरही दावा - Assembly elections
  3. सुषमा अंधारेंचं ठरलं! 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार? - Sushma Andhare Vidhan Sabha

Last Updated : Sep 3, 2024, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.