ETV Bharat / politics

उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, काय आहेत कारणं? - Lok Sabha Election Results 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (4 जून) जाहीर झाले. यात भाजपाप्रणीत एनडीएला देशात बहुमत मिळालं असलं तरी राज्यातील लोकसभेच्या निकालानं सर्वांना धक्का देत संपूर्ण चित्रच पालटून टाकलंय. राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक 13 जागा मिळून काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरलाय. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या सोबतीचा कॉंग्रेसला फायदा झाला, असं बोललं जातंय.

Lok Sabha Election Results 2024 Congress benefited from Uddhav Thackeray know whats the reason
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला उद्धव ठाकरेंचा फायदा (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 7:27 AM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेनं एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांनाही कौल दिल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय. महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीनं 17 जागा आणि महाविकास आघाडीनं 30 जागांवर विजय मिळवलाय. राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक 13 जागा मिळाल्यानं काँग्रेस राज्यातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सतत अपयश येत असताना उद्धव ठाकरेंनी तारलं. तसंच उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. मात्र, या चर्चांमागची कारण काय याबद्दल आपण जाणून घेऊया.

उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेस पक्षाला यश? : दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका किंवा अन्य निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं बघायला मिळालं. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचं नेतृत्व करत उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरेंबरोबर काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरातहे सुद्धा होते. त्यांच्या कामातील उत्साह निवडणूक प्रचारात, सभा आणि कार्यक्रमात दिसून आला. त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत पाहायला यश मिळालं. त्यामुळं काँग्रेसच्या यशामागे उद्धव ठाकरेंचाही मोठा वाटा आहे.

संपत चाललेल्या पक्षाला ठाकरेंचा हात : राज्यात भाजपानं शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन मोठे पक्ष फोडले होते. दोन पक्ष फोडल्यानंतर अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव होता. हे सुरु असताना काँग्रेसचे अनेक नेते भाजपात सामील झाले. यामुळं काँग्रेस खिळखिळी झाली होती. परंतु, देशात इंडिया आघाडीचं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा, आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला दिला. तसंच यादरम्यान उद्धव ठाकरेंची खंबीर साथ कॉंग्रेसला मिळाली. त्यामुळं संपत चाललेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला : पक्षनिहाय काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला आहे. काँग्रेसनं 17 जागंवर निवडणूक लढवून 13 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडं शिवसेनेनं (ठाकरे गटानं) 21 जागा लढवून 9 जागांवर विजय मिळवलाय. शरद पवार गटानं 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवलाय. 2019 मध्ये भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला होता. मात्र, 2024 मध्ये काँग्रेसने बाजी मारत स्ट्राईक रेटमध्ये अव्वल स्थान पटकावलंय. देशपातळीवर काँग्रेसचा 62.9% इतका स्ट्राईक रेट राहिलाय.

हेही वाचा -

  1. शरद पवारांची चाणाक्य नीती त्याला उद्धव ठाकरेंची साथ, पडली महायुतीवर भारी; 45 पार म्हणणारे सपशेल फेल - Lok Sabha Result 2024
  2. कुणी पती निधनानंतर रोवला विजयाचा झेंडा, कुणी नणंदेचा केला पराभव; जाणून घ्या लोकसभेतील विजयी 'रणरागिणी' - Lok Sabha Election Result 2024
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2024: 'या' सात मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का, का पडले दिग्गज? घ्या जाणून - Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.