ETV Bharat / politics

राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक; अमरावती पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल - Anil Bonde Controversial Statement

Anil Bonde Controversial Statement : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या आरक्षणासंदर्भातील वक्‍तव्‍यावर टीका करताना भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी पुन्‍हा एकदा वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केलय. त्‍यावर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

Anil Bonde Controversial Statement
अनिल बोंडेंच्या वक्‍तव्‍यावर काँग्रेस आक्रमक (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 7:30 PM IST

अमरावती Anil Bonde Controversial Statement : राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं वादग्रस्त वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केलं. दरम्यान त्यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. तक्रार दाखल करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला.

पोलीस आयुक्तालयात गोंधळ : अनिल बोंडे यांच्या विरोधात तक्रार देण्याकरता काँग्रेसचा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला असता पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस आयुक्तालयात जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी रोखल्यामुळं आमदार यशोमती ठाकूर प्रचंड संतापल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अनिल बोंडेंच्या वक्‍तव्‍यावर काँग्रेस आक्रमक (Source - ETV Bharat Reporter)

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला रोष : पोलीस आयुक्तांच्या दालनात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे रोष व्यक्त केला. अनिल बोंडे यांची भाषा शहरात आणि राज्यात अशांतता पसरवणारी असून त्यांचा उद्देश केवळ दंगली भडकवणं आहे, असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस आयुक्तांना सांगितलं.

अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडलं आहे. एखादी अडाणी व्यक्ती असं काही बोलत असेल तर समजू शकतो. मात्र, डॉक्टर असणारी व्यक्ती असं काही विधान करत असेल, तर नक्कीच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. - आमदार यशोमती ठाकूर

अनिल बोंडेंविरुद्ध तक्रार दाखल : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यांनी खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं. भैया पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा

  1. "यांचं मानसिक संतुलन बिघडलं...", अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया - Anil Bonde Controversial Statement
  2. "अनिल बोंडे यांना तत्काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा"- 'त्या' वादग्रस्त विधानावरून यशोमती ठाकूर यांचा निशाणा - Maharashtra Politics
  3. "राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखाचं बक्षीस", आ. संजय गायकवाड यांना विधान पडलं महागात, गुन्हा दाखल - Sanjay Gaikwad On Rahul Gandhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.