ETV Bharat / politics

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीवरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, कशावरून नेमका आहे वाद? - Team India Mumbai Victory Parade - TEAM INDIA MUMBAI VICTORY PARADE

Political Leaders On Team India Victory Parade : टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरणाऱ्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुरुवारी (4 जुलै) मुंबईत चाहत्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, या विजयी मिरवणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

Political Leaders On Team India Victory Parade
रोहित पवार आणि उदय सामंत (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 2:11 PM IST

Updated : Jul 5, 2024, 2:47 PM IST

मुंबई Political Leaders On Team India Victory Parade : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मुंबईत गुरुवारी (4 जुलै) जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअपर्यंत विजय रथ काढण्यात आला. भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळं अनेकांना श्वसनाचा त्रास झाला तर काही प्रमाणात पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि बीसीसीआयवर निशाणा साधला.

काय म्हणाले रोहित पवार? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रोहित पवार म्हणाले की, "विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या गर्दीच नियंत्रण सरकार आणि बीसीसीआयनं करायला हवं होतं. तसंच टीम इंडियाच्या बॅनरवर खेळाडूंपेक्षा मंत्र्यांचे जास्त फोटो बघायला मिळाले. त्यामुळं यांना स्वतःची टिमकी वाजवण्यातच जास्त इंटरेस्ट असल्याचं स्पष्ट झालं. बॅनर बघून असं वाटत होतं जणू यांनीच वर्ल्डकप जिंकला. खेळात कोणतंही राजकीय गणित आणू नये. तसंच महायुतीच्या या खेळाडूंना महाविकास आघाडी नक्की पराभूत करेन," असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तर "महाराष्ट्र सरकार गुजरात धार्जिणे आहे. त्यांनी टीम इंडियासाठी गुजरातवरून बस का आणलीय. तिकडून बस आणणे याचा अर्थ महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखं आहे", अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया : भारतीय क्रिकेट टीमच्या विजयरथ यात्रेसाठी गुजरातवरून बस आणल्यामुळं विरोधकांनी सरकारला लक्ष केलं. यावर प्रतिक्रिया देत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, "आपले खेळाडू विरोधकांशी खिलाडू वृत्तीनं कसं वागतात, हे विरोधकांनी शिकावं. 24 तासांच्या आत कार्यक्रम घ्यायचा होता. त्यामुळं लवकरात लवकर सर्व व्यवस्था करण्यात आली".

हेही वाचा -

  1. भारतीय क्रिकेट संघाच्या परेडसाठी कडक सुरक्षा व्यवस्था : चाहत्यांची मरीन ड्राइव्हवर गर्दी, रोड शोसाठी टीम इंडियाची बस तयार - T20 World Cup 2024
  2. टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातची बस का? हा महाराष्ट्राचा अपमान... , मिरवणूक बसवरून विरोधकांची टीका - Nana Patole On Cricketer Bus
  3. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर अनेकांना भोवळ; मरीन ड्राईव्हवर काय होती परिस्थिती? - Team India Mumbai Victory Parade
Last Updated : Jul 5, 2024, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.