ETV Bharat / politics

माजी अधिकारी, स्वीय सहाय्यकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे वेध, लोकप्रतिनिधी बनण्यासाठी प्रयत्न सुरू - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव, म्हणून काम करताना प्रत्यक्ष राजकारणात जाण्याची अनेक अधिकाऱ्यांची इच्छा होते. या निवडणुकीतही अशा काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरु केलेत.

Maharashtra Politics
महाराष्ट्रचे राजकारण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2024, 7:49 PM IST

मुंबई : राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक, खासगी सचिव आणि सरकारी अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम करताना, राजकारण जवळून पाहिलेल्या अधिकाऱ्यांना, स्वीय सहाय्यकांना थेट राजकारणात प्रवेश करुन लोकप्रतिनिधी बनण्याचे वेध लागले आहेत. अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही जण उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत तर काहीजण अद्याप वेटिंगवर आहेत.

सिध्दार्थ खरात यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश : मंत्रालयातील सहसचिव पदावरुन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सिध्दार्थ खरात यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. याठिकाणी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने डॉ. संजय रायमुलकर या विदयमान आमदारांना शिंदे सेनेकडून उमेदवारी जाहीर केलीय.

स्वीय सहाय्यक, खासगी सचिव रिंगणात उतरण्याची शक्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव असलेले सनदी अधिकारी बालाजी खतगावकर यांनी राजीनामा देऊन नांदेडमधील मुखेड मतदारसंघातून लढण्याची तयारी केली. या मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी जाहीर केल्यानं खतगावकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू ओएसडी मंगेश चिवटे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. या मतदारसंघात अपक्ष संजय शिंदे आमदार आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून इच्छुक आहेत. वानखेडे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यांना वर्धा लोकसभेचे प्रभारी करण्यात आले होते. या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार बाबाराव केचे आहेत. या मतदारसंघाची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हे आहेत स्वीय सहाय्यक ते विधानसभा अध्यक्ष : यापूर्वी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले दिलीप वळसे पाटील राजकारणात येऊन आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी पदे भूषवली. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे स्वीय सहाय्यक असलेले अमित साटम आमदार आहेत. राम नाईकांचे स्वीय सहाय्यक असलेल्या विनोद शेलार यांना भाजपाने यावेळी उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेले मिलींद नार्वेकर २०२४ मध्ये विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले.

मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक ते केंद्रीय मंत्री : युती सरकारच्या काळातील मंत्री महादेव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुबोध मोहिते शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. १९९९ ला त्यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला. २००४ला श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला. सुबोध मोहिते यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पदावर काम केलं.

देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक विधिमंडळात : देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून २०१९ ला आमदार झाले. त्यांना पुन्हा भाजपाने उमेदवारी दिली होती. फडणवीसांचे दुसरे सहाय्यक असलेल्या श्रीकांत भारतीय यांना विधानपरिषदेचे आमदार पदी नियुक्त करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून राज्याचे माजी परिवहन आयुक्त, माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे शेकापच्या उमेदवारीवर २०१४ मध्ये विजयी होऊन आमदार झाले. त्यांना शेकापने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी राजकारणात आल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. बदलत्या परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला, मात्र संदीप नाईक राष्ट्रवादीत गेल्याने नाहटा पुन्हा शिंदे सेनेत परतले. ते या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रचंड इच्छुक होते.

शासकीय सेवेत असताना अनेक लोकोपयोगी कामे करण्यामध्ये, शासननिर्णय घेण्यामध्ये, कायदे बनवण्यामध्ये सहाय्य केलं. विविध विकासकामाचा अनुभव मिळाला. सर्वसामान्य तळागाळातील परिस्थितीतून आल्यानं या अनुभवाचा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षनेतृत्वाने उमेदवारीची संधी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरुन या ठिकाणी विजयी होण्याचा विश्वास आहे. सरकारी सेवेत काम केल्याचा अनुभव असलेले अधिकारी राजकारणात आल्यास त्यांना कामाचा अनुभव असल्यानं त्याचा लाभ नागरिकांना मिळण्याची शक्यता वाढीस लागते. - सिध्दार्थ खरात, माजी अधिकारी, शिवसेना उबाठा उमेदवार

पोलीस आयुक्त ते केंद्रीय राज्यमंत्री : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारुन २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. विजयी झाल्यानंतर ते केंद्रात राज्यमंत्री म्हणून देखील काम केले. तसेच ते दोनवेळा लोकसभेवर विजयी झाले. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी निवृत्तीनंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन महासंघाने उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात आला. माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रेम कुमार जैन रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी राजकारणात प्रवेश करुन २०१४ मध्ये बसपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी अधिकारी हिकमत उढाण यांनी २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

हेही वाचा -

  1. धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती
  2. अमित ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय; आदित्य ठाकरे म्हणतात...
  3. राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करतो; संजय राऊत यांना तुम्ही फार मनावर घेऊ नका - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.